संगमनेर । झुंजार न्यूज
राष्ट्रीय छावा संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्षपदी प्रविण कानवडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर काळकुटे पाटील व प्रदेशाध्यक्ष निखिल दादा गोळे यांच्या प्रमुख चंद्रशेखर विशे, श्याम महाराज भाकरे, शांताराम जी गायकवाड, गगन डेव्हलपर्स चे संचालक संभाजी हासे, नाशिक जिल्हाध्यक्ष कृष्णा घाटोळ उपस्थितीत देण्यात आले.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे नुकतीच संघटनेची पदाधिकाऱ्यांचे निवड बैठक संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील संघटनेच्या विविध पदांच्या निवडी करण्यात आल्या. यामध्ये संस्थापक अध्यक्ष गंगाधर काळकुटे पाटील व प्रदेशाध्यक्ष निखिल दादा गोळे यांनी प्रविण कानवडे यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रवीण कानवडे हे महाराष्ट्रभर छावा संघटनेचा झंझावात निर्माण करतील असा विश्वास संस्थापक अध्यक्ष गंगाधर काळकुटे पाटील व प्रदेशाध्यक्ष निखिल दादा गोळे यांनी व्यक्त केला. मागील वीस वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये काम करत असणारे असणाऱे प्रविण कानवडे यांना दोन वर्षांपूर्वी छावा संघटनेची उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम पाहिले त्यानंतर गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी विविध आंदोलने केली. तसेच संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम घेतले. ऐतिहासिक पेमगिरी येथे युवराज संभाजी राजे छत्रपती आगमन सोहळा यशस्वीरित्या पार पाडला होता.मराठा आरक्षणासाठी संभाजी राजांच्या उपोषणात आझाद मैदान येथे सक्रिय सहभाग, शिवजयंती उत्सव ,गेट वे ऑफ इंडिया येथील शंभूराजे जयंती उत्सव, छत्रपती संभाजी नगर येथील संघटनेचा वर्धापन दिन मेळावा अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून कानवडे यांनी आपले कार्य चालू ठेवले.

या निवडी नंतर प्रवीण कानवडे म्हणले, माझी राष्ट्रीय छावा संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. यापुढे संघटनेने दिलेले जबाबदारी सार्थ ठरवून संघटनेची ध्येय धोरणे, विचारधारा समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याबरोबर अन्याय अत्याचाराविरुध्द लढा प्रबळ दिला जाईल असे ते म्हणाले.

यावेळी ठाणे जिल्ह्याचे कार्यकारणी निवडण्यात आली. कानवडे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
