आश्वी । झुंजार न्यूज 

संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील राजकिय दृष्टया प्रतिषठेच्या अशा आश्वी खुर्द ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणूकीसाठी राज्याचे महसुलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूलमंत्री आ बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यानी निवडणुकीकरिता कंबर कसून संरपचपदाकरिता १० तर ११ जागेच्या सदस्य पदाकरिता ४७ उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पुन्हा एकदा विखे – थोरात गटाची स्पर्धा या निवडणुकीतून दिसून येणार आहे  .

आश्वी खुर्द लोकनियुक्त सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही गटाकडून सरपंच पदासाठी १० उमेदवारी अर्ज तर सदंस्य पदाच्या ११ जागासाठी ४७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. असे असले तरी गुरुवारी दि . २५ ऑक्टोबरला अर्ज माघारीच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल .

आश्वी खुर्द ग्रामपंचायतीवर राज्याचे महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील गटाची सत्तां ग्रामपंचायत स्थापनेपासून आजपर्यंत असल्याने थोरात गटानीही सत्तां आपल्याकडे खेचण्यासाठी कंबर कसल्याचे चित्र दिसत आहे .


विखे गटाचे माजी जिल्हा परिषद सदंस्य अण्णासाहेब भोसले , विखे कारखान्याचे संचालक डॉ. दिनकर गायकवाड, माजी संचालक अँड. अनिल भोसले, बाळासाहेब मांढरे, सौ. कांचनताई मांढरे, यांच्या नेतृत्वांखाली तर तात्यासाहेब गायकवाड, बापुसाहेब भवर, संजय भोसले , इन्नुस सय्यद  या थोरात गटाच्या कार्यकर्त्याच्या नेतृत्वाखाली निवडणूकीचे चित्र निर्माण केल्याचे दिसत आहे . आश्वी खुर्दच्या आजु – बाजुच्या गावांतील कार्यकर्त्यामध्येही निवडणुकीचा उत्साह पहावयास मिळत आहे .

प्रभाग १ :-  रुपाली सुनील क्षिरसागर, दिपाली देविदास वाळेकर, प्रतिक्षा मिलिंद जाधव, सुवर्णा राजेंद्र सातपुते, कल्पना विक्रम सातपुते, कल्पना सचिन क्षिरसाग, प्रज्वल जगदीश मुन्तोडे

प्रभाग २ :- गणेश दिनकर भडकवाड, सागर दिनकर भडकवाड, संतोष भास्कर भडकवाड, भरत छब्बु भडकवाड, इन्नुस छन्नुमियाॅ सय्यद, शकिल इस्माईल शेख, मोहीत गंगाधर गायकवाड, विजय विठ्ठल गायकवाड, देवराम पांडुरंग गायकवाड, विठ्ठल बजाबा गायकवाड, नानुबाई तात्या माळी, छाया विजय गायकवाड, शबाना शकील शेख, गुलनाज कमाल सय्यद 

प्रभाग ३ :- लक्ष्मण सदाशिव वाल्हेकर, सौ. आशा बंडु मुन्तोडे, सौ. शोभना प्रकाश सोनवणे, जनाबाई देवराव शिंदे, दत्तात्रय सोन्याबापू मांढरे, आशा बाजीराव दातीर, देवराम राधाकृष्ण शिंदे, संजय गबाजी भोसले, पुनम राजेंद्र गायकवाड, योगिता संजय शिरतार, 

प्रभाग ४ :- बाबासाहेब प्रताप भवर (दोन अर्ज), सोपान मधुकर सोनवणे, (दोन अर्ज), देवराम पांडुरंग गायकवाड (दोन अर्ज), दत्तात्रय बापूसाहेब गायकवाड, लक्ष्मण सदाशिव वाल्हेकर, नागेश शरद गिते, चंद्रकांत छब्बु गिते, सतिष निवृत्ती गायकवाड, संकेत गोकुळ गपले (दोन अर्ज), आशा सुरेश मोरे, संगिता दत्तात्रय बर्डे, प्रमिला संतोष बर्डे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले

 तर लोकनियुक्त सरपंच पदासाठी सौ. अलका बापुसाहेब गायकवाड, सौ. छाया विजय गायकवाड, सौ. जयश्री संजय गायकवाड, सौ. सोनाली मोहित गायकवाड, सौ. सविता सुनिल गायकवाड, सौ. दिशा दत्तात्रय गायकवाड, सौ. शोभना प्रकाश सोनवणे, सौ. शालिनी दत्तात्रय सोनवणे, सौ. पुजा संतोष भडकवाड, सौ. स्वाती सोपान सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

 आश्वी खुर्द ग्रामपंचायतीचे ३ हजार ३११ इतके मतदान आहे. या निवडणुकीत सदस्य पदासाठी ४७ तर सरपंच पदासाठी १० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. त्यामुळे गावातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवार दि २५ ऑक्टोबंर रोजी माघारीच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल . दाखल झालेल्या अर्जाची छाननी सोमवार दि २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता सुरु होईल त २ उमेदवारी अर्ज २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यत मागे घेता येईल. यांचं दिवशी चिन्ह वाटप होणार असून मतदान ५ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. व ६ नोव्हेंबर रोजी सकाळी मतमोजणी व निकाल जाहीर होईल.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *