संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पुर्व व पठार भागाच्या माळरानावरील कौठे – मलकापूर येथील उभारलेल्या श्री गजानन महाराज साखर कारखान्याचा 2023 – 2024 चा 7 वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ गुरुवार दि 26 आक्टोबर 2023 रोजी दुपारी12.30 वा संस्थापक अध्यक्ष रविंद्र बिरोले व सौ अश्विनीताई बिरोले यांच्या हस्ते संप्रन्न होणार असल्याची माहिती व्यवस्थापक भाऊसाहेब मंडलिक यांनी दिली .
![]()
संगमनेर तालुक्यातील पठार भागाला वरदान ठरलेल्या कौठे – मलकापूर येथील श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड ( भक्तनगर ) या कारखान्याच्या गळीत हगांम 2023 – 24 च्या बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ होत असून गेल्या 6 वर्षाचा गळीप हंगाम अनेक समस्यावर मात करत अध्यक्ष रविंद्र बिरोले व कारखाना व्यवस्थापकांनी यशस्वीरिता पार पाडला . 2023 -24 च्या बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभा प्रसंगी कारखाना स्थळी सकाळी 9 वा .श्री गजानन महाराज अभिषेक व महाआरती , सकाळी 10 वा .श्री च्या पालखीची मिरवणुक , सकाळी 10.25 वा . श्री च्या पालखीची पुजा , सकाळी 10.35 वा . वेदोक्त मंत्रोपचाररात होमहवन कार्यक्रम , दुपारी 12.30 वा .अग्नी पदीपन समारंभ , तर दुपारी 1 वाजता स्नेह भोजन होईल .


