पानोडी । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी या गावातील मराठा समाज्याला आरक्षण मिळावे म्हणून सर्व समाज्यातील लोकांनी एकत्र येत गांव बंद ठेवले जो पर्यत आरक्षण मिळणार नाही तोपर्यत गुरुवारी पासून गावांतचं साखळी उपोषण करण्याचा सर्वानी निर्णय घेतला .   
संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाकरिता गावोगावी गांव बंदी , साखळी उपोषण , मुक मोर्चा तरुणा वर्गाकडून होताना दिसत आहे शैक्षणिक , नोकरी मिळविण्यासाठी होणारा अटापिटा बघून सर्वसामान्य मराठा समाज्याचा माणुस घायाळ झाल्याचे दिसून येत आहे . मनोज जरांगे यांनी आपली प्रामाणिक व स्वच्छ भूमिका लोकासमोर ठेवून उपोषणाचा मार्ग निवडल्याने गावोगावी तरुण वर्ग आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे . त्याचंप्रमाणे पानोडी गांवात सुद्धा मराठा समाज्यासह दलित , मुस्लिम , वंजारी समाज्याने ही आरक्षण मिळण्याकरिता एकत्र येत आरक्षण मिळावे ही भूमिका घेत गांव बंद ची हाक दिली त्यास सर्व समाज्यातील व्यावसायिकांनी सहभाग घेवून आपला पाठिंबा दर्शविला .
यावेळी भाऊसाहेब चव्हाण , बाळासाहेब कदम , अशोक तळेकर , दिपक जाधव , भारत शेवाळे यांची भाषणे झाली .
यावेळी भाऊसाहेब चव्हाण , अशोकराव तळेकर , बाळासाहेब कदम , रावसाहेब घुगे , रामनाथ पवार ,  उपसंरपच विक्रम थोरात , नानासाहेब कदम , भारत शेवाळे , संजय जाधव ,  रंगन्नाथ मुंढे , गोपाळ थोरात , महादू खेडकर , बाबासाहेब तळेकर , बळवंतराव थोरात , पांडूरंग सांगळे , नय्युम सय्यद , दिपक जाधव , संतोष चव्हाण , संकेत तांबे , जब्बर अशरफी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .
चौकट
मराठ आरक्षण हे तात्पुरत्या स्वरुपात नको , ते नियमाधरुन व कायदानुसार कायम स्वरुपी दया  
भारत शेवाळे ( सामाजिक कार्यकर्ते , पानोडी )
व्यवसायानुसार जातीची निर्मिती झाली कालातरांनी त्यानुसार आरक्षण मिळू लागले त्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठयाना आरक्षणाची व्यवस्था केली मात्र त्यावेळी पुढारलेल्या लोकांनी नाकारल्याने आज मराठा समाज्याची ही दुरवस्था झाली 
 अशोकराव तळेकर ( माजी उपसंरपच , पानोडी )
लोकसंख्येच्या वाढीनुसार मराठा समाज ही विखुरला गेल्याने आज मराठा समाज्याला आरक्षणाची आवश्यकता असल्याने मराठा समाज्याला आरक्षण मिळावे ही बाबासाहेबांची ही इच्छा होती , रामदास आठवले यांची पहील्यापासून मागणी राहिली आहे आमचा ही पाठिंबा आहे 
बाळासाहेब कदम ( संगमनेर ता उपाध्यक्ष रिपाई ) 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *