संगमनेर । झुंजार न्यूज

 

निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यावरील कामगारांना त्यांच्या वस्तीवर सोडू येत असताना सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास पिंप्री लौकी अजमपूर – पानोडी शिवावर ट्रॅक्टर पलटी होवून २५ वर्षीय तरुणांचा जागेचं मृत्यु झाला .
सविस्तर माहिती अशी की , संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील असणार्‍या विजय विनायक कदम हा २५ वर्षिय युवक निळवंडे धरणातील उजव्या कालव्यावरील होत असलेल्या कामावर कत्राटी पद्धतीने ट्रॅक्टर चालक म्हणून कामाला होता कामावरील साहित्य व मंजूरांची ने – आण हे काम त्यांच्याकडे होते . सोमवारी दिवसभर कालव्यांचे काम चालू होते . त्यानंतर कामगारांना आश्वी बु ॥ येथील सोमवारी आठवडा बाजाराकरिता विजय कदम यांनी नेले होते त्यानंतर उशिरापर्यत कामगारांना आश्वी बु हून ते पिंप्री लौकी अजमपूर येथील कामगार वस्तीवर नेवून सोडले . रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी पानोडी येथे येत असताना कदम – मुंढे वस्ती जवळील वळणाला ट्रॅक्टर कंड्रोल न झाल्याने ट्रॅक्टरला झटका बसल्याने विजय कदम हा ट्रॅक्टर वरुन फेकला गेला मात्र क्षणाचा विलंब न होता तो ट्रॅक्टर विजयचा अंगावर पडल्याने त्यांचा जागेचं मृत्यु झाला सुनसान वस्ती असल्याने विजयला लवकर मदत न मिळाली नाही .
त्याच्या पश्चात आई – वडील , भाऊ , बहीण , चुलते असा मोठा परिवार असून मोठ्या संख्येने ग्रामस्थ अंत्यविधीसाठी उपस्थित होता . 
चौकट
विजय कदम हा घरातील कर्ता युवक होता त्यांचे कुटुब अतिशय गरिबी परिस्थितीत आपले जीवन जगत आहे तरी जलसंधारण विभागाकडून त्याच्या परिवारास मदत व्हावी अशी मागणी होत आहे  
संध्या निळवंडे धरणाच्या होत असलेल्या उजव्या कालव्याच्या कामामुळे पुर्व भागातील बहुतांश रस्त्यांची दयनिय आवस्था झाली आहे तर कालव्या शेजारील उंचावर झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे . 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *