थोरात कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

संगमनेर । झुंजार न्यूज

विधिमंडळ पक्षनेते तथा मा. कृषी व महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याच्या विकासाची कामधेनू असलेल्या व देशातील सहकारासाठी आदर्शवत असणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 57 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ साध्या पद्धतीने संपन्न झाला.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023 -24 या गणित हंगामाचा शुभारंभ मा. आ. डॉ सुधीर तांबे, व राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आणि कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांच्या हस्ते झाला यावेळी बाजीराव पा . खेमनर, इंद्रजीत भाऊ थोरात, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे , रामहरी कातोरे,अजय फटांगरे ,व्हा.चेअरमन संतोष हासे, संचालक गणपतराव सांगळे, चंद्रकांत कडलग, मीनानाथ वरपे, अभिजीत ढोले, रोहिदास पवार, माणिकराव यादव, अनिल काळे, भाऊसाहेब शिंदे ,डॉ तुषार दिघे ,रमेश गुंजाळ, विनोद हासे, संभाजीराव वाकचौरे ,सौ मंदाताई वाघ, श्रीमती मीराताई वरपे ,सुरेश झावरे ,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते. यावेळी कृषी शैक्षणिक सहकार क्रांतीचा जागर असणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त स्टिकर चे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बोलताना मा. आ. डॉ. तांबे म्हणाले की, हे वर्ष थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. भाऊसाहेब थोरात यांनी कायम तत्त्वाचे राजकारण केले असून त्यांनी कधीही तत्त्वाची तडजोड केली नाही .अमृत परिवारासाठी राजहंस हा ब्रँड त्यांनी दिला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत तन्मयतेने आणि शिस्तीने ही आदर्श व तत्वे जपत सहकाराला आधुनिकतेची जोड देऊन संगमनेरचा सहकार देशासाठी मॉडेल बनवला आहे.

मॅनेजमेंट कशी असावी तर थोरात सहकारी साखर कारखान्यासारखी अशा प्रकारचे उत्तम काम येथे होत असून हा कारखाना सहकारातील इतर कारखान्यांसाठी मापदंड ठरला आहे .आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील ग्रामीण विकासासह शैक्षणिक प्रगती ही मोठी झाली असून यामुळे आर्थिक संपन्नते बरोबर समृद्ध प्रगती झाली आहे. ही वाटचाल आपल्या सर्वांना कायम जपायचे असल्याचे सांगताना सरकारने मराठा आरक्षणावर तातडीने भूमिका घेत या समाजाला त्वरित आरक्षण द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

तर बाबासाहेब ओहोळ म्हणाले की, प्रत्येक हंगाम हा आव्हानात्मक असून यावर्षी कमी पाऊस आणि कमी उसामुळे कारखानदारीमध्ये अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे .आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे या कारखान्यावर सभासद ऊस उत्पादक, कार्यक्षेत्र बाहेरील उत्पादक या सर्वांचा मोठा विश्वास असून कारखान्याने कायम उच्चांकी भाव देताना सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी काम केले असल्याचे ते म्हणाले.


याप्रसंगी ॲड .अशोक हजारे, ॲड मधुकरराव गुंजाळ, बाबासाहेब शिंदे, बापूसाहेब गिरी, तुळशीनाथ भोर , ॲड सुहास आहेर, कारखान्याचे सेक्रेटरी किरण कानवडे, नवनाथ गडाख, अशोक मुटकुळे, ॲड शरद गुंजाळ यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले .सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हा. चेअरमन संतोष हासे यांनी आभार मानले

चौकट

मराठा आरक्षणाला आ. थोरात यांचा पाठिंबा व सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे दुसऱ्या टप्प्यातून उपोषण सुरू आहे. या लढ्याला प्रथमपासूनच काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी पाठिंबा दिला असून मराठा समाज बांधवांच्या भावनांचा आदर करून आमदार थोरात यांच्या उपस्थितीत विघ्नहर सहकारी साखर कारखाना जुन्नर, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संगमनेर यांसह राज्यभरात असलेले पूर्वनियोजित कार्यक्रम त्यांनी रद्द केले आहेत. त्यामुळे साध्या पद्धतीने थोरात सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ संपन्न झाला..

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *