संगमनेर । झुंजार न्यूज
नाशिक विभाग कार्यक्षेत्र असणारी व संगमनेर तालुक्यात अग्रगण्य असणाऱ्या संग्राम पतसंस्थेने या वर्षी सभासदांच्या सेव्हिंग्स खात्यावर १५ टक्के लाभांश वर्ग करण्यात आला असल्याची माहिती चेअरमन श्री. राणीप्रसाद मुंदडा यांनी दिली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्तीत, मा. ना. बाळासाहेब थोरात साहेब (विधानसभेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते) यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे व मा. आ. सत्यजितदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने आपला आलेख उंचावत ठेवला आहे. संस्थेने नेहमी सामाजिक उपक्रमात आपला भरीव सहभाग दिला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून संस्थेतर्फे यावर्षी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावा आणि विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गुणगौरव करण्यात आला.
सालाबादप्रमाणे यंदाही संस्थेने आपल्या सभासदांना दिपावलीनिमित्त भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधीर तांबे, चेअरमन श्री. राणीप्रसाद मुदंडा, व्हा. चेअरमन इंजि. विजय गिरी, संस्थेचे संचालक मंडळ आणि संस्थेचे सन्माननीय सभासद, संस्थेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षामध्ये संस्थेला रु. २ कोटी ३१ लाखांचा नफा झाला असुन ३१/१०/२०२३ अखेर संस्थेच्या रु. ११३ कोटी ०८ लाखांच्या ठेवी आहेत. संस्थेने ९२ कोटी २७ लाख रकमेचे कर्ज वाटप केले आहे व ४४ कोटी ७३ लाख रकमेची सुरक्षित गुंतवणूक केली आहे. संस्थेचा स्वनिधी रु. २१ कोटी ८८ लाख आहे. राखीव निधी रु. ८ कोटी २१ लाख आहे तसेच इमारत निधी रु. ७ कोटी ४२ लाख आहे. संस्थेच्या नवीन इमारतीचे बांधकाम ऑक्टोबर महिन्यात सुरु करण्यात आले आहे. संस्थेने ठेवींवर आकर्षक व जास्त व्याजदर देण्याचे धोरण याही वर्षी कायम ठेवले आहे. कर्जदारांना कमीत-कमी व्याजदराने कर्ज पुरवठा केला आहे. संस्थेकडे ठेवीदार व कर्जदारांचा ओघ वाढत आहे. संस्थेला या वर्षी ऑडिट ‘अ’ वर्ग मिळाला आहे.
या प्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन श्री. राणीप्रसाद मुदंडा, व्हा. चेअरमन इंजि. विजय गिरी, डॉ. नाजिमुद्दीन शेख, श्री. विलास दिघे, डॉ. माणिकराव शेवाळे, श्री. सुर्यकांत शिंदे, श्री. नानासाहेब वर्पे, श्री. दत्तात्रय आरोटे, ॲड. प्रशांत गुंजाळ, श्री. श्रीकांत कोकणे, श्री. सुदीप वाकळे, डॉ. सुचित गांधी, श्री. उमेश बोटकर, श्री. सोमेश्वर दिवटे, सौ. सुलभाताई दिघे, सौ. सुनंदाताई दिघे, श्री. अनिल सातपुते, सी. ए. अमित कलंत्री व व्यवस्थापक श्री. उमेश शिंदे व कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेच्या वतीने सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
