संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथिल पानोडी सह दूध उत्पादक संस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या संस्थेकडून दिपावलीनिमित्त दूधाचे रिबेट व अनामत रक्कमेपोटी प्रतिलिटर ४ रुपये २० पैसे प्रमाणे उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात ५५ लाख रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती चेअरमन गणेश जाधव , सचिव एकनाथ खेडकर यांनी दिली .
स्व शिवाजीराव थोरात यांनी शेतकऱ्यांची आर्थिक बाजू सक्षम होण्याकरिता पानोडी सहकारी दूध उत्पादक संस्था ही स्थापन करत दूध उत्पादकाची ‘ कामधेनु ‘ म्हणून नावारुपास आणले पारदर्शक व्यवहार, योग्य वजन व वेळेत नियमित पगार यामुळे संस्थेने सभासद व दूध उत्पादकामध्ये विश्वास निर्माण केल्यामुळे संस्थेकडे दूध घालणाऱ्याची संख्या वाढत आहे.
यावर्षी दिपावलीनिमित्त संस्थेने दूध उत्पादकाची दिवाळी गोड व्हावी यासाठी दूधाचे रिबेट व अनामत रक्कमेपोटी प्रतिलिटर ४ रुपये २० पैसे प्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात ५५ लाख रुपये वर्ग केले .
दरम्यान नेहमी दूध उत्पादक व सभासदाच्या हितासाठी झटणाऱ्या संस्थेने दिवाळीनिमित्त दिलेल्या भेटीमुळे सभासद व दूध उत्पादकानमध्ये आनंदाचे वातावरण असून संस्थेचे चेअरमन गणेश संपतराव जाधव , व्हा. चेअरमन भिमराज खैरे , संचालक विनायकराव थोरात , बाळासाहेब तळेकर आबासाहेब जाधव , विठ्ठल घोडेकर , गोपाळ थोरात , संजय पाबळ , दत्तात्रय चव्हाण , कारभारी गोलवड , सौ रोहीनी पाबळ , झुंबरबाई सानप , संस्थेचे सचिव एकनाथ खेडकर व कर्मचारी मारुती पाबळ यांनी दिपावलीनिमित्त सर्वाना शुभेच्छां दिल्या आहेत.
