संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्याच्या पुर्व भागातील पिंप्री लौकी व पंचक्रोशितील भाविकांच्या नवसाला पावणारी व निसर्गाच्या सानिध्यात असलेले भवानी माता मंदिर हे जागृत देवस्थानाचा सर्वागिण विकास व्हावा म्हणुन हे देवस्थान क ‘ वर्ग तिर्थक्षेत्रात सामावेश होऊन विकास कामासाठी मोठा निधी मिळण्यासाठी भाविक भक्तांनी राज्याचे महसुल मंत्री ना राधाकृष्ण विखे पा यांची शिष्ठ्रमंडळानी भेट घेऊन मागणी केली .
ना विखेनी संबधित अधिकार्यांना सुचना देऊन माहीती घेऊन तातडीने काम करण्याच्या सुचना दिल्यामुळे लवकरच या देवस्थानाचा क ‘ वर्गा मध्ये सामावेश होईल असे आश्वासन दिल्यामुळे भक्त गण व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले . पिंप्री लौकी गावापासुन ५ ते ६ कि.मि (दरा ) खरशिंदे चौधरवाडी शिवावर भवानी माता निसर्गाच्या साधिन्यात भक्ताच्या वर्गणी मधुन सुंदर असे मंदिर उभे राहिले आहे . हा परिसर पर्यटन स्थळ व हिरव्यागार अशा झाडी मध्ये भवानी मातेचे हे मंदिर भक्ताच्या नवसाला पावणारे आहे . या मंदिराचे लोकवर्गनिणीतुन भव्य दिव्य असे काम नुकतेच केले आहे येथे महिला पुरुष भक्ताची मोठी रेलचेल असते डोगराच्या कुशित बसलेल्या या मंदिरा पर्यन्त जाण्यासाठी रस्ता अडचणीचा असल्यामुळे भक्तांना खुप त्रास होतो मंदिर शुशोभिकरण व रस्ता करण्यासाठी निधीची मोठी आवश्यकता असल्यामुळे हे तिर्थक्षेत्र क ‘ वर्ग तिर्थ क्षेत्रात समावेश झाल्यानंतर झपाट्याने सर्वागिण विकास होईल अशी भक्तगणाची अपेक्षा आहे लवकरच हे काम मार्गाला लागेल अशी अपेक्षा आहे येथे दरवर्षों मोठा नवरात्र शारदीय उत्सव साजरा होतो लाखो भाविक महिला दर्शनाचा लाभ घेतात . भवानी मातेचे निसर्गाच्या साधिन्यात बसलेले मंदिर भक्तांचे व पर्यटाकांचे तिर्थक्षेत्र होईल यात शंका नाही भाविक भक्तांनी सडळ हातांनी मदत करावी असे आवाहन मंदिर समितीने केले . या तिर्थक्षेत्राचा लवकरच क ‘ वर्ग तिर्थक्षेत्रात सामावेश होण्यासाठी शिष्ट्रमंडळात मंदिर समितिच्या वतीने मा चेअरमन प्रभाकर दातीर जनसेवा मंडळाचे अध्यक्ष श्री भारतराव गिते . विः का सो मा चेअरमन भाऊसाहेब लावरे श्री भाऊसाहेब मुंढे श्री अनिलराव गिते वि का सो चेअरमन सिताराम दातीर सरपंच सौ संगिता गिते उपसरपंच श्री दौलत दातीर श्री लक्ष्मण निवृती गिते श्री शंकराव दादा लावरे श्री भिमराज गिते श्री गोकुळ गिते महादेव भिवराज गिते विठोबा सांगळे तान्हाजी गिते मासरपंच भिकाशेठ गिते . मा सरपच रमेश कदम हरिभाऊ दातीर सुभाषराव आव्हाड . श्री भाऊसाहेब दातीर मारुती कृष्णा गिते .
. आदिसह भक्तांनी केले आहे .
भक्त गणासह शिष्ठ्रमंडळ मा ना राधाकृष्ण विखे पा भेटुन लवकरात लवकर जागृत देवस्थान भवानी माता मंदिरासाठी भरिव निधी मिळण्यासाठी मागणी करणार आहे .
