संगमनेर । झुंजार न्यूज

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यानी नियोजनबद्ध व कुशल पद्धतीने समाज्याची एकनिष्ठ काम करा भविष्यात आपल्या समाज्याचा प्रतिनिधी विधानसभा , लोकसभेत पाठविण्याकरिता कार्यकर्त्यानी तन – मनाने काम करा असे आवाहन रेवननाथ जाधव यांनी केले 
राहाता तालुक्यातील लोणी येथील माळी वस्ती मध्ये एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाची अध्यक्ष रेवननाथ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत व आदिवासी संग्राम परिषदेचे नेते सुरेशराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संप्रन्न झाली .
यावेळी प्रदेशध्यक्ष भाऊराव माळी , राष्ट्रीय महासचिव डॉ राहुल आहिरे , महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तुषार आहिरे , माधव भांगरे , कैलास दादा माळी , गवराज माळी , भीमराज माळी ,  विजय पिंपळे , संजय चव्हाण , भीमा साळुंखे , जालिंदर  माळी , मारुती पवार , भानुदास भालेराव , कैलास पवार , सोमेश्वर कुसळकर , आकाश माळी , सुरेश पवार , अरुण बर्डे , किशोर बर्डे , भाऊराव माळी , रमेश पवार , बाळासाहेब जाधव , गणू माळी , अनिल पगार , महिला आघाडी नेतृत्व सौ शोभाताई बारगळ , सौ निर्मलाताई पवार ,  सौ सखुबाई जाधव , सौ जयश्री भालेराव आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते .
यावेळी नवी आशा नवी दिशाच्या धोरणानुसार 2024 या कालखंडामध्ये एकलव्य आदिवासी बहुजन पक्षावतीने ग्रामपंचायत , जिल्हा परिषद , पंचायत समिती , विधानसभा , लोकसभा निवडणुकीत सर्व ताकदीनिशी उतरणार असून आदीवाशी समाज्याची मोठी ताकद उभी करणार असे रेवननाथ जाधव बैठकीत म्हणाले 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *