आश्वी | झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त संरपचासह सदस्याकरिता नुकत्याचं पंचवार्षिक निवडणुका झाल्यानंतर उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत बाबासाहेब प्रताप भवर यांची उपसंरपचपदी बिनविरोध निवड झाली . 
उपसंरपच पदाकरिता विखे गटाकडून बाबासाहेब प्रताप भवर यांचा अर्ज दाखल झाला त्यांना सूचक म्हणून सागर दिनकर भडकवाड यांनी सहमती दिली तर थोरात गटाकडून संजय गबाजी भोसले यांचा अर्ज दाखल झाला होता मात्र सूचक नसल्याने सदर अर्ज अपात्र ठरल्याने बाबासाहेब प्रताप भवर यांच्या नावावर उपसरपंच म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले.
सदर निवडणूक ही लोकनियुक्त संरपच सौ अलकाताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली . तर निवडणूक अधिकारी म्हणून संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता मिसाळ यांनी काम पाहिले या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी इल्हे , कामगार तलाठी भालचीम तसेच प्रवरा सा.का. संचालक डॉ.दिनकर गायकवाड , दूध संस्थेचे संचालक मकरंद गुणे, प्रवरा सहकारी बँकेचे संचालक बापूसाहेब गायकवाड, जनसेवा मंडळ लोणी ऑफिसचे प्रमुख बापूसाहेब गायकवाड, राम गायकवाड, बाळासाहेब मांढरे, माणिक भवर, निलेश भवर, प्रशांत कोडोलिकर यांच्यासह ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *