आश्वी । झुंजार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील पुर्व भागातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील राजकिय दृष्टया प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या आश्वी बु॥ ग्रामपंचायतमध्ये नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच नामदेव शिंदे , उपसरपंच सौ अरुणा विजय हिंगे यांनी आपल्या पदाचा पदभार नुतन ग्रामपचायत कार्यालयात स्विकारला यावेळी माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात गटाच्या कार्यकर्तांत्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा पदभार सोहळा पार पडला .
अलिकडेच अहमदनगर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. यात संगमनेर तालुक्यातील आश्वी बु॥ ग्रामपंचायत मध्ये माजी महसूलमंत्री आ बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व विजय हिंगे यांच्या नेतृत्वाखाली अमरेश्वर ग्रामविकास मंडळाचे दहा सदस्यासह सरपंचपदी नामदेव शिंदे हे विजयी झाले, तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा विकास मंडळाला सहा जागे वरचं समाधान मानावे लागले . 
नामदेव शिंदे यांनी सरपंच पदभार स्विकारल्यानंतर एकाच विचार धारेचे अमरेश्वर ग्रामविकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवून बहूमत सिद्ध केले . उपसंरपचाच्या पदाकरिता थोरात गटाच्या सौ अरुणा विजय हिंगे यांनी तर विखे गटाकडून तात्यासाहेब खेमनर यांनीअर्ज दाखल केला . उपसरपंच पदाकरिता दोन अर्ज झाल्याने मतदान घेण्यात आले यात सौ हिंगे यांना दहा तर खेमनर यांना सहा मते पडली . त्यानुसार सौ अरुणा विजय हिंगे यांच्या गळ्यात उपसरपंच पदाची माळ पडली. निवडणुक अधिकारी म्हणून संगमनेर नगरपालिकाचे मुख्याधिकारी वाघ यांनी काम बघितले .
यावेळी अझरुद्दीन सिकंदर शेख , जयश्री विजय केदारी , अरुणा विजय उर्फ पांडुरंग हिंगे , भाऊसाहेब तात्यासाहेब खेमनर , मीना आंतोन गायकवाड , सारीका विशाल पाटील , अनिल राधाकिसन कगंणकर , बाळासाहेब नानासाहेब मदने , बिजयाबाई भास्कर मोरे , अविनाश गिताराम गायकवाड , बबनराव भाऊराया शिंदे , पुजा राहुल राखपसरे , अभिजित शंकर ताजणे , दर्शना संतोष ताजणे , परीगा बाबासाहेब गायकवाड आदी नुतन सदस्यांसह माजी संरपच महेश गायकवाड , माजी उपसंरपच राहुल ज-हाड व कार्यकर्ते उपस्थित होते .
चौकट
आ.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व विजयराव हिंगे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ , पारदर्शक व प्रामाणिकपणाने गांवाच्या विकासात्मक कामे करत फक्त विकासाचा ध्यास ठेवणार असं मत यावेळी सरपंच शिंदे व उपसंरपच सौ हिंगे यांनी व्यक्त केले .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *