आ थोरात हे राज्याच्या विविध प्रश्नांची जाण असलेले अभ्यासू नेते
संगमनेर । झुंजार न्यूज
प्रगतशील पुरोगामी व सुसंस्कृत म्हणणाऱ्या महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण हे अत्यंत दुर्दैवी आहे .मात्र अशा परिस्थितीतही विचारांशी प्रामाणिक रहात सातत्याने लोकांच्या प्रश्नांसाठी कार्यरत असणारे लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या जाणकार नेतृत्वाची राज्याला गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कवी साहित्यिक डॉ विठ्ठल वाघ यांनी केले आहे.
राज्यातील ज्येष्ठ कवी व निवृत्त प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ यांनी विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांची सुदर्शन निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी आमदार थोरात यांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला.
यावेळी डॉ वाघ म्हणाले की, महाराष्ट्राला विचारांचा वारसा आहे. मात्र राजकारणाची धांदल आणि घाई गर्दी दुर्दैवी आहे. सतत लोकांमध्ये रमणारा ,विविध प्रश्नांची जाण असणारा ,शांत संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्व असलेला नेता म्हणून आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे राज्य पाहत आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे विचार घेऊन आमदार बाळासाहेब थोरात हे काम करत आहेत. संगमनेर तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करताना त्यांनी राज्याच्या कृषी क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर एका शेतकरी पुत्राने एकाच वेळी कृषी आणि शिक्षण खाते सांभाळले हे अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. शिक्षणातूनच शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण होण्यासाठी त्यांनी अत्यंत ऐतिहासिक निर्णय राबवले.
सहकार ,शिक्षण, ग्रामीण विकास, जलसंधारण , दुग्ध व्यवसाय ,पर्यावरण याचबरोबर कला व साहित्य क्षेत्राशी आमदार थोरात यांचा स्नेह राहिला आहे साहित्य क्षेत्रातील विविध नामवंत व्यक्तींची त्यांचा जवळचा परिचय असून हे चांगल्या राज्यकर्त्याचे वैशिष्ट्य असते.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, शरद पवार, विलासराव देशमुख यांच्या पंक्तीत असणारे अशा लोकाभिमुख नेतृत्वाची राज्याला गरज आहे.
चौकट
नाशिकच्या साहित्य संमेलनातील भाषण यादगार
अखिल भारतीय साहित्य संमेलन हे प्रत्येकासाठी नेहमीच संस्मरणीय असून मागील वर्षी नाशिक येथे झालेल्या साहित्य संमेलनात तत्कालीन महसूल मंत्री तथा विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेले भाषण हे संस्मरणीय व यादगार ठरले असून सर्व साहित्यिक व माध्यमांनी या भाषणाचा आवर्जून गौरवपूर्ण उल्लेख केला होता असे ही ते म्हणाले
