श्वी । झुंजार न्यूज

वाळू व्यवसायातून ग्रामीण भागातील सामाजिक वातावरण दुषित होवून बेकायदेशीर वाळू वाहतूकीने सर्वांसाठी डोकेदुखी ठरली होती. आता सरकारच्या नव्या वाळूच्या धोरणामुळे ग्रामीण भागातील घरकुल व सर्वसामान्य माणसासह विविध योजनाकरिता रास्त पद्धतीने वाळू सदैव उपलब्ध होवून लागल्याने हा लोकांच्या दृष्टीने हा मोठा निर्णय झाला याकरिता आधिकाऱ्यांचे मोठे सहकार्य लाभल्याचे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हटले .

अहमदनगर जिल्ह्यातील आठ ठिकाणी वाळू विक्री केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे वाळू विक्री केंद्राचे उट्घाटन करण्यात आले 

यावेळी डॉ विखे कारखान्याचे चेअरमन कैलासराव तांबे , रामभाऊ भूसाळ , प स माजी सदस्य तबाजी मुन्तोडे , मच्छिद्र थेटे , भाजपा तालुका उपाध्यक्ष संदिपराव घुगे , जि प माजी सदस्या सौ कांचनताई मांढरे , सौ रोहीनीताई निघुते , संरपच सौ अलकाताई गायकवाड , जेहूरभाई शेख , ग्रा प सदस्य सागर भडकवाड , भाजपा जिल्हा सचिव अशोक ज-हाड , भिमा शिंदे , डॉ दिनकर गायकवाड , आण्णासाहेब म्हस्के , बापूसाहेब गायकवाड , पांताधिकारी शैलेंद्र हिंगे , तहसिलदार धिरजकुमार मांजरे , केद्र प्रमुख निखिल घुगे , सचित घुगे आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .
 ना राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले, राज्यात आतापर्यंत ७८ वाळू विक्री केंद्र सुरू झाली आहेत. त्रुटी दूर करून वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. वाळू व्यवसायातील माफियाराज संपुष्टात येत असल्याने ग्रामीण भागातील गुन्हेगारी रोखण्यात यश आले. पर्यावरणाचे रक्षण आणि सामाजिक दृष्टीकोन ठेवून राज्यात वाळू धोरणाची अंमलबजावणी सुरू केली. धोरणाचा विषय सर्वांसाठी नवीन असल्याने काही आव्हाने होती. सामान्य माणसाला अतिशय स्वस्त दरात वाळूची उपलब्धता होत आहे. धोरण करतानाच घरकुल लाभार्थ्‍यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्याच्या निर्णयाचा लाभही लाभार्थ्यांना मिळत असल्याचे विखे पाटील म्हणाले. तर या वाळू धोरणाचा सर्वाधिक फायदा हा ग्रामीण भागातील गुन्‍हेगारी रोखण्‍यासाठी झाला असून वाळू व्‍यवसाय पूर्णपणे माफियामुक्‍तीकरिता  नागरिकांचं सहकार्याचीही गरज आहे तर आधि काऱ्यांचे मोठे सहकार्य लाभले आहे असे विखे पाटील शेवटी म्हणाले.
चौकट 
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गयाबाई त्रिभुवन या महिलेसह पाच घरकुल लाभार्थ्याना मोफत वाळू देण्याची पावती देण्यात आली तर ८ वाळू केंद्राच्या माध्यमातून १ लाख ८० हजार ब्रास वाळूचे वाटप होणार असून आता पर्यत घरकुलासह सर्व सामान्यांना ३ लाख ६२ हजार ब्रास वाळू उपलब्ध करुन देण्यात आली 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *