संगमनेर । झुंजार न्यूज
काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या कामातून संगमनेर तालुका व शहर हे राज्यासाठी विकासाचे मॉडेल ठरले आहे .शहरातील घोडेकर मळा, साईबाबा मंदिर ,पंपिंग स्टेशन, गंगामाई घाट परिसरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या म्हाळुंगी नदीवरील पुलासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांच्याच प्रयत्नातून या पुलाचे काम सुरू होत आहे .मात्र ज्यांनी श्रेयासाठी पूलाचा निधी अडवण्याचा प्रयत्न केला ती भाजपाची मंडळी आता खोट्या बातम्या देऊन श्रेय घेण्याचा केविलवाणी प्रयत्न करत असल्याची टीका शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी केली आहे.
निखिल पापडेजा यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, संगमनेर शहरातील प्रत्येक विकास कामासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनीच पाठपुरावा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संगमनेर शहरात हायटेक बस स्थानकासह वैभवशाली इमारती उभ्या राहिल्या आहेत. निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन द्वारे 24 तास मिळणारे पाणी, नुकताच झालेला हॅपी हायवे यासह अनेक मोठमोठी विकास कामे राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहेत .2022 मध्ये आलेल्या पुरामुळे म्हळुंगी नदीवरील पूल खाचला होता. त्यामुळे घोडेकर मळा, पंपिंग स्टेशन, ओहरा शाळा व महाविद्यालय, गंगामाई घाट परिसरातील नागरिकांना जाण्या- येण्यासाठी गैरसोय झाली होती. यामुळे या पुलाचे काम तात्काळ व्हावे याकरता आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना 30 नोव्हेंबर 2022 रोजी पत्र देऊन या कामासाठी शाळेत 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी केली होती.
आमदार बाळासाहेब थोरात हे विधान मंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत .याचबरोबर राज्यातील विविध खात्यांचे मंत्रिपद त्यांनी अत्यंत सक्षमरित्या सांभाळले असून सध्या काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आहेत .सर्व पक्षांशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध असल्याने मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या कामाला साडेचार कोटींचा निधी दिला.
मात्र हा निधी मिळू नये या कामी स्थानिक भाजपाने सत्ताधाऱ्यांनी मार्फत आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला हे सर्वश्रुत आहे.
आता पुलाच्या कामाला सुरुवात होणार असल्याने हीच मंडळी श्रेयासाठी सरसावली आहे.
त्यांनी एक तरी चांगले काम केले का ? याचे उदाहरण जनतेला दाखवले पाहिजे
फक्त पत्रक बाजी करण्यात पुढे असल्या या पुढार्यांचे किंवा त्यांच्या पक्षाचे विकास कामांमध्ये योगदान काय असा सवाल करताना आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातूनच हे काम होणार असल्याचे सर्व नागरिकांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या खोट्या बातम्यांना जनता कधी बळी पडणार नाही असेही निखिल पापडेजा यांनी म्हटले आहे
