संगमनेर । झुंजार न्यूज

 

काँग्रेस पक्ष नेते तथा मा. महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सततच्या विकास कामांमधून संगमनेर शहर व तालुका हे विकासाचे मॉडेल ठरले असून संगमनेरातील हायटेक बस स्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, यांसह विविध स्मारकांसाठी भरीव निधी मिळावा याकरता आमदार सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली असून यामुळे संगमनेर शहराच्या वैभवात भर पडणार आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार सत्यजित तांबे यांनी या निधीची मागणी केली यावेळी समवेत युवक शहराध्यक्ष निखिल पापडेजा ,शैलेश कलंत्री, मिलिंद औटी  आणि सह विविध सहकारी उपस्थित होते..

संगमनेर शहरातील मध्यवर्ती असलेल्या हायटेक बस स्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा केला आहे .याकरता संगमनेर नगरपालिकेने एसटी महामंडळाला जागा देण्यासाठी प्रस्ताव दिला असून ही जागा तात्काळ मिळावी तसेच महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा उभारून त्या ठिकाणी सुशोभीकरणासाठी एक कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा. याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या सर्व तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ विश्व युद्धात सहभागी झालेले व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्त शहीद नामदेवराव जाधव यांच्या स्मारकास एक कोटींचा निधी मिळावा अशी मागणी निवेदनात केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा, फुले शाहू आंबेडकर स्मारक, संविधान प्रतिमा याचबरोबर शंभर फुटी झेंडा होणार आहे.

या कामासाठी मा.प्रदेशाध्यक्ष तथा मा.महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून या स्मारकांमुळे संगमनेरच्या वैभव मध्ये भर पडणार आहे.. या कामांसाठी पाठपुरावा केल्याबद्दल संगमनेर मधील सर्व नागरिक बंधू-भगिनींनी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांचे अभिनंदन केले आहे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *