नाशिक । झुंजार न्यूज
नाशिकला केंद्राच्या राजकारणात पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे डॉ. भारती पवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच खासदार झाल्या, मात्र त्या आरोग्य तसेच आदिवासी विकास या दोन खात्याच्या राज्यमंत्री झाल्याने त्यांच्या समर्थकांत उत्साहाचे वातावरण आहे.
नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे बारा खासदार आमदार म्हणून निवडून आले. त्यामुळे त्यांना राजीनामे द्यावे लागल्याने त्यात नाशिकच्या डॉ. भारती पवार यांना राज्यमंत्री म्हणून एका विभागाची लॉटरी लागली आहे.
केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे आदिवासी विकास विभागाच्या राज्यमंत्रिपदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार व राज्यमंत्री खासदार रेणुका सिंग यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने हा अतिरिक्त पदभार डॉ. पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड व तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने डझनहून अधिक खासदारांसह केंद्रीय मंत्र्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. यातील १२ हून अधिक मंत्री विजयी झाले आहेत. त्यांचा राजीनामा मंजूर कऱण्यात आला. त्यात रेणुका सिंग होत्या. गुरुवारी डॉ. पवार यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. डॉ. पवार यांनी शुक्रवारी त्यांनी पदभार स्वीकारत कामकाजाला सुरवात केली
