शिर्डी । झुंजार न्यूज

 

राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री या गावात नुकत्याचं झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा राग धरुन काही लोकांच्या जमावाने दोन कुटुंबावर जीवघेणा हल्ला करत कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केल्याने ही घडलेली घटना अतिशय निंदणीय असून अशा प्रवृत्तीला गांवगुंडांना आळा घालण्याकरिता कठोरातील कठोर शासन व्हावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे ( आठवले ) जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे .

 

प्रसिद्धी पत्रकात भालेराव पुढे म्हणाले की , ग्रामपचायत निवडणुकीत हार – जीत होत असते म्हणून काय ? राजकिय सुडाच्या भावनेतून कुटुंबाला बहिष्कार टाकून वाद घालून दहशत निर्माण करणे . ही निंदणीय घटना आहे . काही ठराविक गांवगुंडाच्या हेकेखोरपणामुळे निर्मळ पिंप्री गावांत समाज्या – समाज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला . या घडलेल्या घटनेतून कुटुंब हे दहशती घाली वावरत असून या कुटुंबाला सरकार कसे संरक्षण देणार ? केवळ निवडणुकीचा मनात राग धरुन दोन कुटुंबावर हल्ला होणे हे मानवी समाज्याला कलंक आहे . निवडणुकीत सहभागी होणे हा गुन्हा आहे काय ? दलित समाज्याला निवडणुका अधिकार नाही का ? असा प्रश्न उपस्थित करत या कुटुंबांला न्याय मिळवून देण्याकरिता आंदोलन उभे करणार असून येत्या मंगळवार दि १२ डिसेबर २०२३ रोजी बाभळेश्वर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे .

 

निर्मळ पिंप्री येथील दोन कुटुंबावर झालेल्या भ्याड हल्याच्या विरोधात आवाज उठवून त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याकरिता होणार्‍या आंदोलनात समाज्यातील प्रत्येक माणसांनी संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रिपाई जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , राज्य सचिव विजयराव वाकचौरे , दिपकराव गायकवाड ,  जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , भिमा बागुल , सुभाष त्रिभुवन , संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके , कैलास कासार , योगेश मुंन्तोडे आदीनी केले आहे .

 

चौकट

 

काही गांवगुंड जमावाने दोन कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. सुदैवाने काही पोलीस घटनास्थळी होते त्यामुळे या कुटुंबियांचा जीव वाचला . या कुटुंबाला या गांवगुंडाकडून धोका असल्याने पोलिसांनी यांचा त्वरीत बदोबस्त करा तर समाज्या – समाज्यात तेढ निर्माण करणार्‍या या गांवगुंडाचा त्वरीत बदोबस्त करावा तर उदयाचे हे आंदोलन कोणत्या समाज्याच्या विरोधात नव्हे तर गांवगुंड प्रवृत्ती विरोधात उभे करणार !

 

श्रीकांत भालेराव ( जिल्हा संपर्क प्रमुख रिपाई )

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *