श्रीरामपूर । झुंजार न्यूज
श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील चौफुली येथे शनिवार सायंकाळी ६ वाजता भरधाव वेगाने येणार्या बारा टायर ट्रक पलटी झाल्याने ५२ वर्षिय महीलेचा जागीचं मृत्यू झाला तर एक जण गंभीररित्या जखमा झाल्याने त्याला प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले अतिशय धक्कादायक घटना घडली .
सविस्तर मिळालेली माहिती अशी की , खंडाळा येथील चौफुली येथे एका महीलेसह तीन पुरुष आपल्या कामानिमित्ताने उभे होते मात्र श्रीरामपूर हून येणारा बारा टायर ट्रक भरधाव वेगाने येत असताना काही क्षणात कळेना असे झाले धाड असा मोठा आवाज होवून ट्रक पलटी झाला . म्हणताना वेळ आली होती पण काळ नाही म्हणीनुसार चार पैकी दोन जण पळण्यात यशस्वी झाले मात्र ५२ वर्षिय उषा बाळासाहेब विघावे ही महिला ट्रक खाली सापडली यात तिचा जागेचं मृत्यु झाला तर बेलापूर येथील नाव माहिती नाही हे गंभीररित्या जखमी झाले त्यांना उपचारकरिता प्रवरा रुग्णालयात दाखल केले आहे दूर्घटना होताचं ट्रक चालक गर्दी फायदा घेवून फरार झाला .
झालेली दुर्घटना अतीशय वाईट झाल्याने याबाबत हळहळ व्यक्त होत आहे .
Post Views: 678
