नेवासा । झुंजार न्यूज
एकलव्य आदीवाशी बहुजन पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आदीवाशी समाज्यासह इतर समाज्यातील संघटीत करण्याचे काम करत असून भविष्यात आदीवाशी समाज्याच्यासह बहुजन समाज्यातील सर्व सामान्यांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळावी म्हणून लोकसभा , विधानसभा व स्वराज्य संस्थानमधील होणाऱ्या निवडणुकीत निवडणुका लढविणार कार्यकर्त्यानी कामाला लागा असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष रेवननाथ जाधव यांनी केले .
नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीचे फलकाचे अनावरण पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रेवणनाथ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले . या प्रसंगी जाधव बोलत होते .
यावेळी संजय वाल्हेकर (प्रवक्ते, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य) , दत्तात्रय आगे (प्रवक्ते महाराष्ट्र राज्य), माधव भांगरे, विजय पिंपळे, संजय साठे, माजी सरपंच दगडू बर्डे, संतोष बर्डे ,भिमराज साळुंके अनिल पवार शिवाजी माळी कैलास पवार, बाळासाहेब जाधव रमेश पवार, महिला आघाडी सौ.जयश्री भालेराव , शोभाताई बारगळ, पवार मॅडम सोमनाथ बर्डे, किशोर पवार, आदि कार्यकर्ते उपस्थित होते .
