नवी दिल्ली । झुंजार न्यूज

 

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ला पाठींबा राहणार आहे. एन.डी.ए.चा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. देशभरात रिपब्लिकन पक्षाचे 28 राज्य आणि 8 केंद्रशासीत प्रदेशात संघटन वाढत आहे.त्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरात रिपब्लिकन पक्ष लोकसभेच्या 25 जागा लढविणार असल्याची घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली.

नवी दिल्लीतील कॉन्स्टीटयुशन क्लब येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना ना.रामदास आठवले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरात रिपब्लिकन पक्ष लोकसभेच्या 25 जागा लढविणार असल्याची घोषणा केली.

यावेळी रिपाई राष्ट्रीय महीला आघाडी अध्यक्षा सौ सिमाताई आठवले , रिपाई राष्ट्रीय महासचिव तथा माजी मंत्री अविनाश महातेकर , अॅड बर्वे , प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे , सौ महीला आघाडी राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ शिलाताई अनिल गागुर्डे , सुनिल साळवे आदीसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते .

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *