आश्वी । झुंजार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभेतील राजकिय दृष्टया महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या आश्वी बु॥ येथील राजकिय व सामाजिक चळवळीतील बुलंद नेतृत्त्व समजल्या जाणार्‍या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या एकसष्टी निमित्ताने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदराव पवार यांच्या उपस्थितीत होणार्‍या कार्यक्रमांची रुपरेषा व सदिच्छा भेट म्हणून माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे आश्वी बु॥ आले होते .

 

२ जानेवारी २०२४ रोजी रिपब्लिकन व दलित चळवळीचे नेते बाळासाहेब गायकवाड यांनी आपल्या ५० वर्षाच्या कालखंडात अनेक चळवळी कामे करुन चढ – उतार बघितला . आपल्या बुलंद आवाजातून दुःखी – कष्टी लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले . यातून शरदराव पवार , रामदास आठवले , प्रकाश आंबेडकर , राजा ढाले , नामदेव ढसाळ , बाळासाहेब विखे पाटील , बाळासाहेब थोरात , गोविदराव आदीक , दादा कोंडके , रावसाहेब म्हस्के , अरुण कडू यांच्याशी प्रेमाचे व आदराचे संबंध आले तर विजयराव वाकचौरे , अशोकराव गायकवाड या आपल्या संवगड्या सोबत राजकिय सामाजिक चळवळी सहभाग घेतला .

 

बाळासाहेब गायकवाड यांनी रामदास आठवले असो या शरदराव पवार यांच्याशी प्रामाणिकपणाने काम करत राहिले तसेच सामाजिक कार्यात झुकून देता देता या आपल्या ६० वर्षाच्या कालावधीत त्यांनी एकसष्टीत कधी पदार्पण केले हे समजले नाही ! त्यानिमित्ताने आश्वी बु॥ ग्रामस्थाच्या माध्यमातून शरदराव पवार , रामदास आठवले , बाळासाहेब थोरात , राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आहे .

 

यावेळी बाळासाहेब गायकवाड , दूध संघाचे व्हा चेअरमन राजेंद्र चकोर , संरपच नामदेव शिंदे , माजी संरपच महेश गायकवाड , सुरेशराव थोरात , विजयराव हिंगे , भाऊराव कांगुणे , पापा शेख , होडगर , गणेश गायकवाड , भाऊसाहेब ताजणे , बाळकृष्ण होडगर , संतोष ताजणे , ग्रा प सदस्य अभिजीत ताजणे , अमोल गायकवाड आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *