बाळासाहेब गायकवाड यांच्या अभिष्टचिंतन निमित्त ना आठवले, आ. थोरात , खा. सुप्रिया सुळे आ. जयंत पाटील यांची उपस्थिती
संगमनेर । झुंजार न्यूज
गोरगरीब व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सातत्याने लढा देणारे रिपब्लिकन पार्टीचे नेते बाळासाहेब गायकवाड यांच्या 61 वर्षपूर्ती निमित्त देशाचे ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी दु.3 वा. आश्वी बु बाजार येथे अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आले असल्याची माहिती विजय हिंगे, राहुल ज-हाड व आनंद गायकवाड यांनी दिली आहे.

रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड यांनी सातत्याने आदिवासी ,दिन दलित ,गोरगरीब यांच्यासाठी लढा दिला आहे . अश्र्वी व पंचक्रोशी आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आश्वी बुद्रुक येथे मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजता बाजार तर येथील भव्य प्रांगणात होणार आहे .यावेळी देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार डॉ अमोल कोल्हे ,मा. खासदार बापूसाहेब तनपुरे ,माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, मा. आमदार डॉ सुधीर तांबे ,माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, रावसाहेब नाथाजी मस्के, आमदार रोहित पवार, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, अरुण पाटील कडू, बाबासाहेब ओहोळ, रणजीतसिंह देशमुख, शंकरराव पा.खेमनर, गीताराम गायकवाड, डॉ जयश्रीताई थोरात , विजयराव वाकचौरे ,अशोक गायकवाड, माणिकराव यादव , सुरेंद्र थोरात श्रीकांत भालेराव यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आरपीआयचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमासाठी संगमनेर, राहता , शिर्डी,राहुरी व अहमदनगर जिल्ह्यातील विविध कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अश्वी बुद्रुक ग्रामस्थ व अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे
