समाजकार्यात पुढाकार; बचतगटात वाचन चळवळीला बळ

संगमनेरझुंजार न्यूज

कडक शिस्तीचे थोर स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व मथुराबाई थोरात यांच्याकडून आमदार बाळासाहेब थोरात व दुर्गा तांबे यांना समाजकार्याच बाळकडू मिळाले राजकारण सत्तेसाठी नसून समाजाच्या विकासासाठी आहे, हा मंत्र घेऊन आमदार थोरात व दुर्गा तांबे यांनी कार्य केले. या परिवाराला साहित्य, संस्कृती आणि वाचनाची मोठी परंपरा लाभली आहे. याच शिकवणीतून तांबे यांनी महिला बचतगटात वाचन चळवळ सुरू केली आहे.

तांबे या स्वतः उत्तम कवयित्री व लेखिका आहेत. त्यांनी गाण्यांची शिदोरी एकत्रित राहावी म्हणून ‘जात्यावरील ओव्या’ या पुस्तकाची निर्मिती केली. गायन, वादन, संगीतासह वाचनाची आवड जोपासली. संगमनेर तालुक्यातील बचत गटात वाचन चळवळ रुजवली. मागील वीस वर्षांपासून ‘मैत्रिणी वाचन’ ग्रुप स्थापन केला. संगमनेरमधील सुमारे चार हजार महिलांचा या वाचन चळवळीमध्ये सहभाग आहे. या

मैत्रिणी एक पुस्तक वाचतात आणि आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एकत्र येऊन संवाद साधतात. दुर्गा तांबे यांच्या घरामध्ये मोठे ग्रंथालय असून ई-बुक्स ऑडिओ लायब्ररी हाही मोठा संग्रह आहे. राजकीय व्यक्ती साहित्याच्या सहवासात ही परंपरा यशवंतराव चव्हाण यांच्यापासून घेत तांबे व थोरात परिवाराने सातत्याने ही परंपरा जपली आहे. साहित्य संमेलनाला भेटी, बालसाहित्य संमेलनाचे आयोजन, वाचनालय चळवळ वाढवताना गावोगावी वाचनालय सुरू करण्यात दुर्गा तांबे यांनी पुढाकार घेतला.

याचबरोबर प्रत्येक ठिकठिकाणी वाचनालय सुरू केले आहे. यामधून मोठ्या प्रमाणात पुस्तकांची देवाणघेवाण होते, वाढदिवसाच्या दिवशी फुले किंवा इतर भेटवस्तू न नेता दुर्गा तांबे आवर्जून त्यांना पुस्तके भेट देतात. म्हणूनच माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा वाढदिवस हा पुस्तक मैत्रीदिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. यामागे खरेतर दुर्गा तांबे यांचे मोठे कष्ट आहे.

पाच हजार पुस्तकांचा संच
दुर्गा तांबे यांच्या घरच्या ग्रंथालयामध्ये साधारण पाच हजार पुस्तकांचा संच असून, नवनवीन कादंबऱ्या, कथा लेखन असा मोठा साहित्य संग्रह आहे. यामुळेच माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, दुर्गा तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. हर्षल तांबे यांच्यासह आमदार बाळासाहेब थोरात यांची राज्यात एक साहित्यिक राजकारणी म्हणून ओळख निर्माण झाली आहे. अनेकदा जात्यावरच्या ओव्या दुर्गा तांबे गात असतात. किंबहुना लग्नांमध्ये हळदीच्या समारंभात त्या स्वतः गाण्यासाठी पुढे येतात. दंडकारण्य अभियानाची गाणी ही त्यांनी अनेक लिहिली आहेत.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed