संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर नगरपालिका हद्दीतील संजय गांधी नगर वडार वस्ती येथील झोपडपट्टी धारकांना घरपट्टी लागू करून त्यांना हक्काचा असेसमेंट उतारा मेळावा याकरता काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांसह शिवसेना नेते अमर कातारी यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून यामुळे सर्व नागरिकांना हक्काचा उतारा मिळणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना सौ तांबे म्हणाल्या की, संजय गांधी नगर वडार वस्ती येथील झोपडपट्टी धारकांना घरपट्टी लागू करून त्यांना उतारा द्यावा याकरता शिवसेनेचे शहराध्यक्ष अमर कातारी यांनी सातत्याने पाठपुरावा केला. याबाबत त्यांनी नगरपालीकेकडे वेळोवेळी मागणी करून वेळप्रसंगी आंदोलनही केली.
या मागणीचा विचार करून काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनीही या नागरिकांच्या उताऱ्यासाठी प्रयत्न केले .याचबरोबर विधानपरिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांनी पंधरा दिवसापूर्वी या प्रलंबित मागणी संदर्भात शासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत तसेच मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या समवेत आढावा बैठक घेतली .
शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केल्याने या नगर मधील नागरिकांना घरपट्टी तसेच असेसमेंट उतारा मिळणार आहे म्हाडाच्या अधिकाऱ्यांसमोर पुनर्वसनाबाबत देखील चर्चा करून मंजुरी मिळाली आहे.
स्थानिक नागरिकांचा पाठपुरावा व शिवसेना शहराध्यक्ष अमर कातारी यांनी केलेले प्रयत्न यामुळे संजय गांधी नगर मधील घर धारकांना हक्काचा उतारा मिळणार असल्याने या नागरिकांच्या जीवनामध्ये एक आनंदाचा दिवस निर्माण झाला आहे.
हक्काचे घर उतारा मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात ,आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, व शिवसेनेचे शहराध्यक्ष अमर कातारी यांचे संजय गांधी नगर परिसरातील नागरिकांकडून विशेष अभिनंदन होत आहे
