आश्वी । झुंजार न्यूज
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे शिर्डी लोकसभा मतदार संघात पुन्हा 2024 ची निवडणूक लढविण्यास इच्छुक असून दलित व बहुजन समाज्याच्या प्रश्नाकरिता ते अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व असल्याने शिर्डीतचं नव्हे तर राज्यात , देशातील संपुर्ण गावे , माणसे परिचित असणारे एकमेव नेता असल्याने रामदास आठवले यांना शिर्डीतून लोकसभेची उमेदवारी मिळावी याकरिता जिल्ह्यातील राधाकृष्ण विखेसह भाजपाच्या केंद्रीय व राज्य नेतृत्वाना रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ लवकरचं भेटून मागणी करणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्रारे दिली
या प्रसिद्धी पत्रकात वाकचौरे पुढे म्हणाले की , संध्या देशात व राज्यात भाजपाबरोबर एकमेव दलित नेता म्हणून रामदास आठवले कार्यरत आहे. लोकामध्ये रमणारा नेता आहे गेल्या १० वर्षात भाजपाशी प्रामाणिक राहून बहुजन समाज्याकरिता आवाज उठविला , न्याय मिळवून देण्याकरिता काम करत आहे संपूर्ण देशांच्या काना- कोपर्यात फिरणारा एकमेव नेता असून भाजपा व मित्र पक्षाकरिता लोकाचे मन वळविताना दिसत आहे तर नरेंद्र मोदी सक्षम नेतृत्व आहे तेच संपुर्ण देशाला समाज्याला तारु शकतात हे उघडपणे सांगताना दिसत आहे. गेल्या १०- १२ वर्षापासून भाजपाशी , नरेंद्र मोदीशी एकनिष्ठेने असतान सुद्धा केंद्रा व्यतिरिक्त रिपाई पक्षाच्या कार्यकर्त्याना राज्य सरकारने कुठेल्याही प्रकारे सत्तेच लाभ मिळवून दिला नाही . शासनाच्या प्रवाहामध्ये कार्यकर्त्याला काम करण्याची संधी दिली नाही ही मोठी खेदाची बाब आहे तरी ही बाब कार्यकर्त्यांनी मनावर अजून पर्यंत घेतले नाही मात्र रामदास आठवले यांच्यासह कार्यकर्त्याना ही आठवले यांनी शिर्डी मतदार संघातून येणारी लोकसभा निवडणुक लढवावी ही इच्छा आहे याबाबत ते ही वेळोवेळी सांगत आहे त्याकरिता ते सातत्याने शिर्डी व परिसरात येत आहे त्यांचे उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्याकरिता वातावरण सुद्धा चांगले आहे. शिर्डीची जागा रिपाईला मिळावी म्हणून रामदास आठवले यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेबरोबर चर्चा ही झाली आहे. शिर्डी येथील आमदार व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा.सुजय विखे पाटील यांचेशी ही चर्चा झालेली आहे .
2009 ला रामदास आठवले यांना काही कारणास्तव पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु आता परिस्थिती वेगळी असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेतृत्त्वाखाली भाजप मित्र पक्षाची घौडदोड सुरू आहे येत्या लोकसभेचे एनडीए च्या सुमारे चारशे जागा निवडून येतील व देशाच्या प्रधानमंत्री पदी पुन्हा नरेंद्र मोदी विराजमान होतील. शिर्डीकरासाठी मी पुन्हा येईल आता मात्र विजय निश्चित राहिल या करिता पंतप्रधान नरेद्र मोदी, अमित शहा, जी पी नड्डा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखेशी चर्चा करणार असे रामदास आठवले यांनी वेळो वेळी आपली भावना व्यक्त ही केली आहे .
नुकत्याचं लागलेल्या आमदार अपात्रता निकाला वरुन राज्य सरकार आपला कार्यकाळ पुर्ण करणार असून 2024 ला केंद्रात व राज्यात शिंदे शिवसेना – भाजप युतीचे सरकार येईल. राज्य सरकारचा विस्तार अजूनही झाला नाही विस्तार झाल्यास एक मंत्रीपद व एमएलसी तसेच महामंडळाला दोन , तीन अध्यक्ष , सदस्य व विविध समित्यांवर कार्यकर्ते ना संधी मिळावी तर भाजपाने मित्र पक्ष म्हणून शिर्डी लोकसभा मतदार संघातून रामदास आठवले यांनाचं उमेदवारी दयावी अशी मागणी रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे आदीसह शिष्टमंडळ करणार आहे.
