नगर । झुंजार न्यूज
आशा कर्मचार्यांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ व गट प्रवर्तकांना सहा हजार दोनशे रुपये मानधन वाढ आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत यांनी जाहीर करून सदर मानधन वाढीचा जी आर काढण्यास आरोग्य मंत्री टाळाटाळ करत आहे या गोष्टीचा निषेध करत आज बारा जानेवारी पासुन आशा व गट प्रवर्तक बेमुदत संपावर जात आहे अशी माहीती आयटक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ऍड. कॉ. सुधिर टोकेकर व जिल्हा संघटक सुरेश पानसरे यांनी दिली आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व हक्क व भाऊबीज हे आरोग्यवर्धिनीचे पंधराशे रुपये हे सर्व विनाविलंब आशा कर्मचाऱ्यांना मिळाले पाहीजे जो पर्यंत आरोग्य मंत्र्यांनी केलेली वाढीच्या घोषणा व सदर बाबींचा जीआर जो पर्यंत हातात मिळत नाही तो पर्यंत हा संप मागे घेतला जानार नाही असा निर्धार आशा कर्मचारी संघटनेने केला आहे.
29 डिसेंबर पासुन आशा कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ऑनलाईन कामाबाबद सक्ति करू नये अन्यथा त्या विरोधातही आंदोलन करण्यात येईल.
आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉ. सुधिर टोकेकर यांनी सांगीतले कि महाराष्ट्रातील आशा व गट प्रवर्तक महिलानी 18 आक्टोबर पासुन बेमुदत संप केलेला होता या संदर्भात आठ नोव्हेंबर पासुन सन्मानीय तडजोड झाली त्या मध्ये महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शासकीय आदेश अद्याप मिळालेला नाही. या घटनेस दोन महीने झाले आहेत तरी महाराष्ट्र शासन काही निर्णय घेण्यास तयार नसल्यामुळे महाराष्ट्रातील आशा व गट प्रवर्तक महिलानमध्ये महाराष्ट्र शासनाविरुद्ध प्रचंड असंतोष वाढत चाललेला आहे .
महाराष्ट्रात चार डिसेंबर पासून सुरु असलेल्या अंगणवाडी महीलांच्या संपाला सुधा पूर्ण पाठींबा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आशा कर्मचारी व गट प्रवर्तक यांनी या संपामध्ये जोरदार भागीदारी करावी असे आवाहन अॅड सुधिर टोकेकर व जिल्हा संघटक कॉ . सुरेश पानसरे यांनी केले आहे.
