लोणी । झुंजार न्यूज 

 

राहाता तालुक्यातील लोणी येथे दिनांक २ जानेवारी रोजी शिर्डीचे काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चौगुले व माजी नगरसेवक सुरेश आरणे यांच्‍यावर झालेल्‍या हल्‍ला प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळू लागले आहे. लोणी पोलिसांनी दाखल केलेला गुन्‍हा मागे घ्‍यावा यासाठी आरपीआयच्‍या वतीने निवेदन देवून करण्‍यात आली आहे. पोलिस निरीक्षकांनी खोटे गुन्‍हें दाखल केल्‍याचा आरोपही आरपीआयच्‍या कार्यकर्त्‍यांनी केला आहे.

 

हल्‍ला झाल्‍याच्‍या झाल्‍याच्‍या घटनेत आरपीआय कार्यकर्ते प्रदिप गायकवाड व सागर चांडे यांच्‍यावर लोणी पोलिसांनी जाणीवपुर्वक गुन्‍हें दाखल करुन, एकप्रकारे अन्‍याय केला आहे. त्‍यामुळे पोलिस आधिका-यांवर कारवाई करावी अशी मागणीही निवेदन देण्‍यासाठी गेलेल्‍या शिष्‍टमंडळाने केली आहे.

 

या घटनेनंतर आरपीआयच्‍या कार्यकर्त्‍यांनी गुन्‍हें मागे घ्‍यावेत ही मागणी करण्‍यासाठी पोलिस आधिका-यांची भेटही घेतली होती. परंतू कार्यकर्त्‍यांचे म्‍हणणे ऐ‍कून न घेता व फिर्याद दाखल करुन न घेता कोणत्‍याही तपासाविना आरपीआयच्‍या कार्यकर्त्‍यांवरच पोलिस आधिका-यांनी जाणीवपुर्वक गुन्‍हें दाखल करुन, एकप्रकारे अन्‍याय केला असल्‍याची भावना निवेदनातून व्‍यक्‍त करण्‍यात आली आहे. गुन्‍हे मागे न घेतल्‍यास तिव्र स्‍वरुपाचे आंदोलन करण्‍याचा इशारा देतानाच या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्‍याची मागणी शिष्‍टमंडळाने केली आहे.

 

यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, आरपीआय जिल्हा सचिव राजन ब्राह्मणे, आरपीआय युवक तालुकाध्यक्ष प्रतीक खरात सामाजिक कार्यकर्ते अनिल पलघडमल, लोणी बजरंग दल अध्यक्ष सागर राक्षे, अन्याय अत्याचार निर्मूलन समिती अध्यक्ष निखिल भोसले यांच्यासह आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *