शेडगांव । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील शेडगांव येथील स म भा सं थोरात विदयालय येथे राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात या महान विभूतींचा जयंती कार्यक्रम मोठया उत्सहात साजरा करण्यात आला. स्व.सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात यांच्या जयंती निमित्त प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.
प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विद्यालयात म्यॅरोथॉन स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये विद्यालयातील विध्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. यावेळी विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष,सरपंच,माजी सरपंच,पोलीस पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक , शिक्षक, कर्मचारी, पालक व विध्यार्थी उपस्थित होते.
या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शिवाजी सोसे सर यांनी विध्यार्थी व पालक यांना संबोधित केले.
