आंबेगांव|झुंजार न्यूज
जुन्नर/आंबेगाव येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या आसवणी व इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते व लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाले
यावेळी विघ्नहर कारखान्याच्या इथेनॉल विस्तारीकरण प्रकल्पास शुभेच्छा देत असताना आ. बाळासाहेब थोरात म्हणाले की, विघ्नहर कारखाना म्हटल की, पहिली आठवण येते ती निवृत्तीशेठ शेरकर यांची, माझे वडील तिर्थरूप भाऊसाहेब व त्यांची खुप जवळची मैत्री होती, खासदार म्हणून त्यांनी केलेले काम हे उल्लेखनीय राहिले आहे. त्यांच्यामुळे आम्हाला जुन्नर तालुक्याची आणि येथील कारखान्याची ओळख झाली. सोपानशेठ शेरकर व आता सत्यशील या कारखान्याचे नेतृत्व करत असून अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि काटकसरीने हा कारखाना चालवत आहे.
याप्रसंगी खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, माजी आमदार बाळासाहेब दांगट, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, विविध क्षेत्रातील मान्यवर, सभासद बांधव, कार्यकारी संचालक भास्कर घुले व विघ्नहर्ता परिवारातील सर्व सदस्य, शेतकरी बांधव उपस्थित होते.
