सह्याद्री जुनियर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा आविष्कार
संगमनेर|झुंजार न्यूज
संगमनेर हे गुणवत्तेचे मोठे शैक्षणिक केंद्र आहे सह्याद्री शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने मोठे काम केले असून काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संत व कलावंतांचा आदर करणारे संगमनेर हे विकास व विचारांचे तीर्थक्षेत्र असल्याचे गौरवोद्गार कविवर्य बाबासाहेब सौदागर यांनी काढले आहे.
भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री जुनियर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मा. आमदार डॉ सुधीर तांबे हे होते .तर व्यासपीठावर सौ दुर्गाताई तांबे, सौ कविता सौदागर,तुळशीनाथ भोर, सिताराम वर्पे ,प्राचार्य किसनराव दिघे, सह सेक्रेटरी दत्तात्रय चासकर,आचार्य बाबुराव गवांदे , प्रा एम वाय दिघे , गोविंद डोके, प्रा उगले ,किसन दिघे, धोंडीबा गुंजाळ ,प्रा. गणेश गुंजाळ, मिलिंद आवटी, नामदेव कहांडळ, प्रा रोझा देशमुख आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सह्याद्री महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी सादर केलेली आदिवासी नृत्य पायरी अत्यंत सुंदर झाली याचबरोबर अन्यायाला वाचा फोडणारे मै तुमको ना छोडूंगी या गीताने सर्वांच्या अंगावर शहर आणले तर बारावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली लावणी. विद्यार्थ्यांच्या फ्युजन डान्सने सर्वांना खळखळून हसवले. एकापेक्षा एक सरस गीते सादर करून ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपले कलाविष्कार सादर केले.
यावेळी बोलताना बाबासाहेब सौदागर म्हणाले की, मराठी ही आई असून हिंदी ही मावशी आहे. आत्मविश्वास असेल तर आपण कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो कधीही हार मानू नका आहे त्यामध्ये समाधान माना. मोठ्या व्यक्तींकडून मोठे मन करायला शिका.
संगमनेर मध्ये सांस्कृतिक उपक्रम सातत्याने सुरू असून संगमनेरला मोठी विचारांची परंपरा आहे आमदार बाळासाहेब थोरात हे यशवंतराव चव्हाण यांचे समृद्ध वारसदार असून माजी आमदार डॉ सुधीर तांबे व सौ दुर्गाताई तांबे यांनी साहित्य संस्कृती जपली आहे. महाराष्ट्रात माळ आणि चाळ ही दोन्ही परंपरा जपली जात असून कीर्तनाबरोबरच लावणीचेही चाहते आहे अशी वैभवशाली परंपरा राज्याची आहे. युवा शब्द उलटा केला तर वायू होतो वायूच्या वेगाने आत्मविश्वास ठेवून पुढे जा यश नक्की मिळेल असे ते म्हणाले.
तर माजी आमदार डॉ तांबे म्हणाले की सौदागर हे अहमदनगर जिल्ह्याची भूषण असून अनेक मराठी चित्रपटात त्यांनी गीते लिहिली आहेत. साहित्य क्षेत्रातही करिअरची मोठी संधी असून कला शाखेतून स्पर्धा परीक्षण साठी मोठी तयारी करता येते खरे तर कला शाखेसाठी सामाजिक क्षेत्राचे प्रात्यक्षिकही असावे असेही ते म्हणाले.
तर सौ दुर्गाताई तांबे यांनी मुलींनी आत्मविश्वासपूर्वक पुढे जाताना आपल्या महाविद्यालयाचे कुटुंबाचे व तालुक्याचे नाव रोशन करावे असे आवाहन केले. यावेळी शिक्षक प्रतिनिधी प्रा. संतोष थोरात ,प्रा. चित्रा कुलकर्णी, प्रा नानासाहेब जगताप, प्रा भारत शिंदे ,प्रा नवनाथ गुंड, प्रा सुरेश घोरपडे ,तुषार गायकर,गोरक्षनाथ भवर आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गुणवंत विद्यार्थी व क्रीडा स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य किसनराव खेमनर यांनी केली सूत्रसंचालन प्रा गणेश गुंजाळ यांनी केले तर प्रा. गोविंद डोखे यांनी आभार मानले
चौकट
पतंग उडवून चला चला गीताचे प्रकाशन
कवी बाबासाहेब सौदागर यांनी शब्दबद्ध केलेल्या व अतुल भिसे यांनी निर्माण केलेल्या पतंग उडवू चला चला या बालगीताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हे गीत सर्वासाठी प्रकाशित झाले असून हे गीत सुरू होतात विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला..
