लोणी | झुंजार न्यूज
काही दिवसांपासून ग्रामस्थांमध्ये बिबट्याची दहशत होतीच मात्र आता बिबट्याचे हल्ले वाढत असल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत. ९ वर्षांच्या मुलावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. या धक्कादायक घटनेमुळे लोणी परिसरात खळबळ उडाली आहे.
ही धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात घडली आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 9 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. अनेक दिवसापासून मोकाट फिरणा-या बिबट्याचा वन विभागाने तातडीने बंदोबस्त न केल्याने चिमुकल्याला जीव गमवावा लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
प्रवरा रुग्णालयासमोर राहणारे प्रवीण लहामगे यांचा मुलगा तीसरीमध्ये शिकत होता. अथर्व असं मृत झालेल्या मुलाचं नाव आहे. अथर्ववर रविवारी संध्याकाळी बिबिट्याने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. मित्रासोबत खेळण्यासाठी गेलेला अथर्व घरी परतत असताना ही धक्कादायक घटना घडली
मिळालेल्या माहितीनुसार संदीप गोसावी यांच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अथर्ववर हल्ला केला यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अथर्वची शोधाशोध केल्यानंतर रात्री दहा वाजेच्या दरम्यान त्याचा मृतदेह शेतात आढळून आला.
वनविभागाने कर्मचारी आणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याची परीसरात दहशत होती जर वेळीच पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केले असते तर अथर्वचा जीव वाचला असता असं ग्रामस्थ म्हणत आहेत. या घटनेमळे परीसरात भीतीचे वातावरण निल्माण झालं आहे
