संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील राजकिय दृष्टया महत्वाच्या समजल्या जाणार्या कोकणगांव – शिवापूर येथील संरपचपदासह सदस्य पद रद्द झाल्याने व उपसंरपचाच्या राजीनाम्यामुळे संरपच व उपसंरपचपदचं रिक्त झाल्याने व संरपचाचे स्टे अर्ज आयक्ताने नामंजूर केल्याने अखेर प्रशासक नियुक्त करण्यात आले .
सविस्तर माहिती अशी की , कोकणगांव शिवापूर येथील सौ आशाबाई हनुमंत जोंधळे या विदयमान संरपचाचे घरपट्टी व पाणी पट्टी थकीत राहिल्याने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सदस्यपदासह संरपचपदचं रद्द करण्याचे आदेश काढले काढल्याने सौ जोंधळे यांनी याविरोधात नाशिक अप्पर आयुक्ताकडे स्टे करिता अर्ज केला होते मात्र सबळ पुरेसे पुरावे नसल्याने नाशिक अप्पर आयुक्तांनी त्यांच्या स्टे अर्ज नामंजूर करण्यात आल्याचा आदेश दि . १६ /१/ २०२४ रोजी काढला. तर दि ३० / १२ / २०२३ रोजी उपसंरपच अरुण जानकू जोधळे यांनी आपल्या उपसंरपच पदाचा राजीनामा काही कारणास्तव स्वइच्छाने दिल्याने संरपच व उपसंरपच पदचं रिक्त झाले .
संरपच व उपसंरपच पद रिक्त झाल्याने ग्रामपचायतीचा कारभार सांभाळण्याकरिता प्रशासनाला प्रशासक नियुक्त करण्याची वेळ आली त्यानुसार पचायत समिती मधील कृषी विभागातील विस्तार अधिकारी असणारे एस आर वाकचौरे यांची प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी यांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आली
