शिर्डी । झुंजार न्युज
3 फेब्रुवारी 2024 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांचा आगामी लोकसभा व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात अहमदनगर जिल्हा निरीक्षण आढावा दौरा होणार असल्याने या दौऱ्याच्या नियोजनाची बैठक शनिवार दि.20.1.2024 रोजी राहुरी फॅक्टरी हॉटेल जयश्री या ठिकाणी दुपारी 1.00 वाजता अहमदनगर जिल्ह्याची महत्त्वपूर्ण बैठक उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व राहुरी तालुका अध्यक्ष विलास नाना साळवे यांनी आयोजित केली आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी अहमदनगर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजयराव वाघचौरे, बाळासाहेब गायकवाड, दीपक गायकवाड, राजाभाऊ कापसे, दक्षिणेचे अध्यक्ष सुनील साळवे,अजय साळवे, विभागीय प्रमुख भीमराज बागुल, अहमदनगर शहर जिल्हा अध्यक्ष किरण दाभाडे, गोविंद दिवे, सुभाष त्रिभुवन, प्रवीण लोखंडे, आबा रणवरे, अमित काळे,जिल्हा प्रमुख संघटक राजु नाना गायकवाड, जिल्हा सरचिटणीस मनोज काळे,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप,विजय खरात,विवेक भिंगारदिवे आदी मार्गदर्शन करणार आहेत.
मा. ना . रामदास आठवले यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी तसेच आगामी निवडणुका संदर्भात सखोल आढावा घेण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे दक्षिण नगर व उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आव्हान उत्तर नगर जिल्ह्याचे युवकांचे अध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे,संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुनील शिरसाठ, नेवासा अध्यक्ष सुशील धाईजे, कोपरगाव अध्यक्ष अनिल रणनवरे, अकोला अध्यक्ष राजू गवांदे, राहता अध्यक्ष धनु निकाळे व करण कोळगे, पाथर्डी चे अध्यक्ष बाबा राजगुरू, कर्जतचे अध्यक्ष संजय भैलुमे, श्रीगोंदा चे अध्यक्ष राजू जगताप, पारनेरचे अध्यक्ष राजू उबाळे, अविनाश भोसले नगर, जामखेडचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, शेवगावचे अध्यक्ष सतीश मगर व सिद्धार्थ सगळगिळे,मुस्लिम आघाडीचे आयुब भाई पठाण, छोटू भाई शेख, सलीम शेख तसेच सर्व युवक जिल्हा पदाधिकारी यांनी आवाहन केले आहे
