संगमनेर । झुंजार न्यूज

 जय हिंद युवा मंचचे सक्रिय कार्यकर्ते,  समाज कार्याची आवड असणारे कोळवाडे येथील  अनुदानित आश्रम शाळेत कार्यरत असणारे कर्मचारी शरद बबन बटवाल यांची महाराष्ट्र राज्य नाशिक आश्रम शाळा कर्मचारी संघटनेवर पदाधिकारी म्हणून नुकतीच निवड झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी दिली आहे. 

काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात , माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शरद बटवाल हे सातत्याने सामाजिक कामात सहभाग घेत असतात.  जय हिंद युवा मंचचे सचिव म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले असून युवकांचे मोठे संघटन उभे केले आहे. याचबरोबर आदिवासी आश्रम शाळांमधून सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सातत्याने पुढाकार राहिला  आहे. त्यांची महाराष्ट्र राज्य अनुदानित आश्रम शाळा कर्मचारी संघटना नाशिक या सदस्य संघटनेवर सदस्य म्हणून नुकतीच  निवड झाली आहे.

त्यांच्या निवडीबद्दल आमदार बाळासाहेब थोरात , माजी आमदार डॉ. सुधीर तांबे , आमदार सत्यजित  तांबे , मा. नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे,  इंद्रजीतभाऊ थोरात ,  प्रा. बाबा खरात , रणजीतसिंह देशमुख डॉ. जयश्रीताई थोरात, मुख्याध्यापक दशरथ वर्पे , पर्यवेक्षिका श्रीमती कोल्हे मॅडम आदींनी अभिनंदन केले आहे. 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *