आश्वी | झुंजार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील रहिवासी लक्ष्मण सदाशिव वाल्हेकर यांचे वाडवडील पंडित जवाहरलाल नेहरू पासून काँग्रेसचे निष्ठावंत आणि आता लक्ष्मण हे ही निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काँग्रेस बरोबर आहेत काँग्रेस शिवाय देशाला पर्याय नाही असे म्हणत राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रेत सहभाग होण्यासाठी स्वखर्चाने गुवाहाटी येथे जाणार आहे .

संगमनेर ते मनमाड पर्यंत ते बसचा प्रवास करणार असून मनमाड ते गुवाहाटी असा रेल्वेचा प्रवास करून ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो न्याय यात्रा सहभागी होणार आहे असे वाल्हेकर यांनी सांगितले .

भारत जोडो न्याय यात्रा ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली एक चळवळ आहे ही यात्रा 15 राज्यात फिरणार असून जवळपास तीन महिने यात्रा सुरू असणार आहे जी 14 जानेवारी 2024 रोजी मणिपूरमधील थौबल येथून सुरू झाली आणि 20 मार्च 2024 रोजी मुंबईत संपेल

 

चौकट

 

देशात शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नाही शेतकऱ्याचा विचार कोणीच करत नाही सध्याचं सरकारही शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही देशात भ्रष्टाचाराला उत आला आहे देशात सर्वसामान्यांना काँग्रेसशिवाय पर्याय नाही आम्ही काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करत आहोत म्हणून राहुल गांधींनी सुरू केलेल्या भारत जोडो न्याय यात्रेत संगमनेरचा प्रतिनिधी म्हणून मी सहभागी होण्यासाठी चाललो आहे   

श्री . लक्ष्मण वाल्हेकर ( आश्वी खुर्द )

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *