पानोडी । झुंजार न्यूज
अयोध्या याठिकाणी होणाऱ्या भव्य श्री राम मंदिराची प्रतिष्ठापने निमित्त देशभरात उत्सव साजरा केला जात असताना संगमनेर तालुक्यातील पानोडी मध्ये देखील हा आनंदोत्सव दिवस भरात साजरा केला गेला
गावांतील प्रत्येक मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे घरा – घरासमोर देखील रांगोळ्या काढून दिवे लावण्यात आले तर सकाळी श्रीराम मुर्तीची फटाकेच्या अतिषबाजीत मिरवणुक काढण्यात आली यात मोठ्या प्रमाणात महीलांनी कलश घेवून आपला सहभाग नोंदविला जय श्री रामाचा जयघोष आणि भगवे झेंडे फडवत हनुमान मंदिरापासून मिरवणुक काढण्यात आली होती संपूर्ण गावातून झालेल्या मिरवणुकीतून पुरुषासह महीलांनी फुगड्या खेळत एक प्रकार श्री राम प्रतिष्ठा निमित्ताने आनंद घेत दिवाळी साजरी केली .
तसेच भक्ती संगीत, प्राणप्रतिष्ठा, दीपोत्सव व महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. मंदीरे दिव्यांनी उजळी असून भगवी दिवाळी असल्याचे वातावरण गावामध्ये तयार झाले आहे. तर सायंकाळी किर्तनाचे आयोजन करण्यात येवून धार्मिक वातावरण निर्मिती करण्यात आली विशेष म्हणजे सर्वपक्षीय पदाधिकारी आणि सामान्य नागरिक या आनंदोत्सवात सहभाग घेतला .
