पानोडी । झुंजार न्यूज
खर्या अर्थाने आज सोन्याचा दिवस असून जगाचा बाप आज आयोध्यातील मंदिरात श्री राम स्थानापन्न झाल्याने आता रामराज्य आले असून संपूर्ण विश्व सुखी समाधानी झाले स्वप्नात सुध्दा दुःख येणार नाही फक्त श्री रामाचा जप करा असे आवाहन ह भ प दादासाहेब महाराज रंजाळे यांनी आपल्या किर्तनातून केले .
आयोध्यात श्री राम प्रतिष्ठाना निमित्ताने संपूर्ण देशात दिपोत्सव साजरा होत असताना संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे सुद्धा हनुमान मंदिरासह घरोघरी शेणसडा रांगोळी करुन दिवे लावण्यात आले . तर सकाळी श्री राम च्या जयघोष करत महीलांनी आपल्या डोक्यावर कलश घेवून श्री रामाच्या प्रतिमेच्या संगितमय मिरवणुकीत सहभाग नोंदविला . संपूर्ण गाव हे शक्ती व भगवे मय झाले होते लहान – मोठ्या पासून सर्वानी आनंदोत्सव साजरा केला . तर सायंकाळी ह भ प दादासाहेब महाराज रंजाळे यांचे किर्तन ठेवण्यात आले .
ह भ प रंजाळे महाराज यांनी आपल्या किर्तनातून सांगितले की , रामाचा जन्म हा दुपारचा झाल्याने रामाच्या चेहऱ्यांवर सूर्य प्रकाश पडेल अशी मंदिराची रचना करण्यात आली आयोध्दा मंदिर उत्सवाचे आपण आज ऐतिहासिक साक्षिदार झालो , हा उत्सव अनुभवला रामाची सेवा करा संप्रादायातील आम्ही मोठे नाही रामसागरात आम्ही , तुम्ही छोटेच आहोत स्वतः च्या मनाला रामाचे जोड घ्या आयुष्यात कल्याण होईल . असे सागत रंजाळे महाराजांनी श्रीराम , छत्रपती शिवराय , तुकाराम महाराज यांचे माहिती देत आनंदोत्सवात भक्तीच भर पाडली . संपूर्ण गाव एकोप्यात उत्सवात दिसल्याने महाराजानी गावांची स्तुती केली .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक तळेकर , रावसाहेब घुगे , संजय जाधव , दिपक जाधव , बडू जाधव , पांडूरंग सांगळे , भाऊसाहेब सोनवणे , संतोष चव्हाण , गोपाळ थोरात , बाबुराव जाधव , अशोक सांगळे , संकेत तांबे , रंगन्नाथ मुंढे , जालिंदर तळेकर , रमेश शिरतार आदीसह युवक कार्यकर्तानी प्रयत्न केले .
