आश्वी । झुंजार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालयाचे विदयार्थ्यानी ‘ राष्ट्रीय सेवा योजना ‘ च्या माध्यमातून  पिंप्री लौकी अजमपुर येथील मोठ्याबाबा देवस्थान सुशोभीकरण व स्वच्छता श्रमदान केले.

 

लवकरच मोठेबाबा यात्रा उत्सव पार पडणार असून त्या पार्श्वूमीवर राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी परिसर स्वच्छता, देवस्थानाकडे जाणाऱ्या मार्गातील खडी दगड गोळा करून रस्त्याच्या कडेला टाकले जेणेकरून येणारे जाणारे भक्त भाविक यांना त्रास होणार नाही, प्लास्टिक केरकचरा गोळा करून योग्य विल्हेवाट लावली, गवत खुरपून काढले .

याप्रसंगी आश्वी महाविद्यालयाचे प्राचार्य देविदास दाभाडे सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी अमित शिंदे सर, सर्पमित्र शिवप्रसाद पवार, श्री क्षेत्र मोठ्याबाबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री. प्राध्यापक कान्होजी गीते , भारतराव गीते, राजेंद्र लावरे, मगनराव गीते , दौलत दातीर व 55 विद्यार्थी विद्यार्थिनी स्वयंसेवक आणि बस चालक उत्तमराव भोसले या सर्वांच्या मदतीने मोठ्या बाबा देवस्थानचे श्रमदान पार पडले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *