अमृतवाहिनी संस्थेच्या वतीने सायखिंडी येथे श्रमसंस्कार शिबिर संपन्न

संगमनेर । झुंजार न्यूज
भारत देश हा सध्या सर्वच क्षेत्रात प्रगती कडे वाटचाल करीत असून बलशाली भारत चे स्वप्न साकार करण्यासाठी श्रमसंस्कार शिबिरे अतिशय महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन आदिवासी सेवक प्राध्यापक बाबा खरात यांनी केले आहे.
अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचे औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या वतीने साईखिंडी येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहर बाबा विद्यालयाचे प्राचार्य संदीप सातपुते हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी सेवक प्राध्यापक बाबा खरात हे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य एम बी चव्हाण, कार्यक्रमाधिकारी डॉ.संकेत काळमेघ, प्राध्यापक राहुल थोरात यांसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रा.बाबा खरात म्हणाले की, सहकार महर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या सहकार कृषी आणि शिक्षणाच्या माध्यमातून युवा पिढीला विचाराची आणि जगण्याची दिशा मिळाली आहे दादांचे विचार भविष्यकाळातही वेध घेणारे होते समर्थ भारत अभियान व श्रमसंस्कारच्या शिबिरातून सक्षम मनुष्यबळ तयार होते. राष्ट्रीय सेवा योजनाही रचनात्मक कार्यासाठी अभिप्रेत माणूस घडवणारी जिवंत प्रयोगशाळा आहे. महाविद्यालय शिक्षण घेताना समाजसेवा करणे व्यक्तिमत्व विकास करणे आणि लोकांमध्ये मिसळून रचनात्मक कार्य करणे गरजेचे आहे माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून लोकशाही व सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देऊन निस्वार्थ सेवेची गरज दाखवून देते व्यक्तिगत कल्याणातून समाजाचे कल्याण होत असते स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या जनशताब्दी महोत्सवातून शासनाच्या गोरगरिबांसाठी असणाऱ्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रेरक असणारे स्वयंसेवक म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कार्यरत असावी असे आवाहनही प्राध्यापक बाबा खरात यांनी केले आहे.
यावेळी औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य एम बी चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्तिक आणि प्रियंका यांनी केले तर सर्व धर्मीय प्राथमिक कार्यक्रमाची सांगता झाली.
