कर्जत । झुंजार न्यूज
बाबासाहेबांनी उभ्या केलेल्या सामाजिक , राजकिय चळवळी पुढे घेवून जाण्याकरिता आप – आपल्यातील मतभेद विसरून एकजुटीने काम करा , एकीपणा नसल्यामुळेचं आतापर्यत मित्र पक्षांनी या गोष्टीचा फायदा घेतला आहे असून भाजपासह प्रवरेच्या नेत्याबरोबर रिपाई चे मैत्रीपुर्ण संबंध असताना ही कार्यकर्त्यांना अदयाप सन्मान व सत्तेचा वाटा मिळाला नसल्यांची खंत रिपाई राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी व्यक्त केली .

कर्जत येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या रमाई जयंती उत्सवाप्रसंगी विजयराव वाकचौरे बोलत होते यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रविण घुले , रिपाई जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे , उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश भैलुमे , जिल्हा सचिव अजय साळवे , युवा अध्यक्ष अमित काळे , नगरसेवक भास्कर भैलुमे , श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजू जगताप , जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ कदम , युवक दक्षिण उपाध्यक्ष विशाल काकडे , रामकस न साळवे , सागर कांबळे , लखन भैलुमे , नितीन भैलुमे , आकाश साळवे , अमदिश शेख , सिद्धांत कदम , प्रशांत कदम , सागर भैलुमे , रिपाई प्रसिद्धी प्रमुख दक्षिण देवा खरात , दया भैलुमे , सुरेश इंचके , पारनेर तालुकाध्यक्ष राजू उबाळे , शंकर साठे , गौतम घोडके आदी उपस्थित होते .

यावेळी विजयराव वाकचौरे पुढे म्हणाले की , आता आपण बाबासाहेब , आण्णाभाऊ साठे , छत्रपती , शाहू महाराज , महात्मा फुले या महापुरुषासह अनेकांच्या जयंत्या साजऱ्या करत आहोत मात्र म्हणत्यात ना , प्रत्येक कतृत्वान पुरुषांच्या मागे स्त्रीचा हात असतो त्यानुसार बाबासाहेबांच्या ऐतिहासिक घटनेची खरी शिल्पकार रमाई होत्या

आपला समाज प्रगल्प विचाराचा असल्याने पँथर काळापासून कर्जत तालुका ज्वलत चळवळीचा साक्षिदार राहिला आहे .चव्हाण , राक्षे , ठोळसर , भैलुमें असे अनेक कार्यकर्ते घडले गेल्या ४० वर्षा पासूनचा तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संबध राहिला आज चळवळ थांबल्याची खेद व्यक्त करत वाकचौरे म्हणाले की , आपली चळवळ ही रस्त्यावरची असून सोशल मिडीयाच्या माध्यमातून चळवळ चालत नाही तेव्हा कार्यकर्त्यानी एकजुट होवून गावा – गावात , वाड्या – वस्त्यावर जावून सामाजिक व राजकिय चळवळ मजबूत करा . बाबासाहेबाच्या तत्वानुसार शिका , संघटीत व्हा व संघर्ष व राज्यकर्ते बना तर समाज सुधारेल . त्यानुसार संपुर्ण देशासह राज्यात रामदास आठवले यांनी गावो – गावी , खेडो – पाडी सामाजिक चळवळीसह राजकिय चळवळी उभ्या केल्या .रिपाई कार्यकर्ता हा निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे मात्र आपल्या घरातचं मतभेद असल्याने मित्र पक्ष यांचा फायदा घेतो . तेव्हा एकत्र या ! बाबासाहेबांनी उभे केलेले कार्य व सामाजिक चळवळ देशांचा कणा आहे .

तर रिपाई पक्ष हा सर्व जाती – धर्माच्या लोकांना बरोबर घेवून जाणारा पक्ष असून रिपाई पक्ष ज्या पक्षाबरोबर असेल त्या पक्षाची सत्ता निश्चित येते . तेव्हा २०२४ मध्ये पुन्हा मोदी सरकार येणार असल्याने रिपाई पक्षाला सन्मान देवून शिर्डीसह लोकसभेच्या दोन जागा दयावे आणि तालुक्या – तालुक्यात रिपाई कार्यकर्त्याचा योग्य सन्मान व्हावा याकरिता कार्यकर्त्यानी मतभेद विसरुन पक्ष बळकटी करिता पक्ष वाढीचे काम करावे
श्रीकांत भालेराव म्हणाले की ,
पँथर व रिपाई चळवळीतून विजयराव वाकचौरे यांनी जिल्हा बांधला घरा – घरात रामदास आठवले यांचे विचार पोहचविल्यानेचं आजही येथील माणसाच्या मना – मनात चळवळ रुजलेली दिसून येत आहे आता युवकांनी ही चळवळ जोमात पुढे न्यावी असे आवाहन केले तर रमाईच्या त्यागातून बाबासाहेब घडले , बाबासाहेब घडल्याने समाज सुधारला व उंचाईवर गेला . तर
” रमाईने बाबासाहेबा जवळ पंढरपुरला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र जाती व्यवस्थेमुळे रमाईची ही इच्छा बाबासाहेबांना पुर्ण करता आली नाही मात्र बाबासाहेबांच्या कार्यातून कालातराने दादर येथे दुसरे पंढरपुर निर्माण झाले ६ डिसेबर रोजी अथंग जनसमुदाय आज बाबासाहेब – रमाईचे दर्शन घेतात ” .
प्रविण घुले म्हणाले की ,
बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला देशाला दूरदृष्टी दिली . संविधानाच्या माध्यमातून देशाला एकसंघ ठेवण्याचे काम केले याकरिता बाबासाहेबांनी अनेक संघर्ष पार केले ते रमाईमुळेचं हे कोणी ही विसरणार नाही पँथरच्या काळापासून अनेक वेळा रामदास आठवले जवळून बघितले त्यांचे कार्य पाहिले त्यांना ही चळवळ उभी करताना मोठ्या अडचणी आल्या मात्र आठवलेसह कार्यकर्त्यानी जोमाने काम केले तर ज्यांनी सामाजिक , राजकिय चळवळी उभी केली त्यांला अभिवादन केलेचं पाहिजेल काहीनी लेखनीतून तर काहीनी काव्यातून चळवळ उभ्या केल्या .
चळवळी कुठल्याही असो काम करणाऱ्याच्या चेहरा हा नेहमी चौकटीत असतो त्यामुळे त्यांना कुठे टाका ती व्यक्ती तेथे फिट होते .
अजय साळवे म्हणाले की ,
माता रमाईच्या त्यागातून बाबासाहेबाना मोठी उर्जा मिळाली त्या उर्जामुळेचं त्यांना सामाजिक काम करण्याकरित वेळ मिळाला त्यातून संविधान निर्माण झाले हे ऐतिहासिक घटना ! घडली . तर
रिपाई कार्यकर्ते प्रामाणिक काम करतात पण मित्र पक्षाकडून त्यांचा योग्य तो सन्मान होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली .
