आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील विखे पाटील गटाचे एकनिष्ठ कार्यकर्ते कैलास पाटील यांच्या पत्नी कविता कैलास पाटील यांची भाजपा महिला मोर्चा संगमनेर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली .
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील अहमदनगर जिल्हा अध्यक्ष महिला मोर्चा कांचनताई मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवड करण्यात आली
या निवडीबद्दल संगनमेर तालुक्यातील भाजप तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, युवा मोर्चा अध्यक्ष अमोल खताळ, अभियंता सेलचे प्रदेश उपाध्यक्ष इंजिनिअर हरीश चकोर, जिल्हा सरचिटणीस साहेबराव आंधळे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष गोरख मंडलिक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले
