आश्वी । झुंजार न्यूज 

माजी महसूलमंत्री तथा कॉग्रेस पक्षाचे जेष्ठ नेत आ. बाळासाहेब थोरात यांनी एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष रेवणनाथ जाधव यांच्या लोणी येथील निवासस्थानी येथे सदिच्छा भेट घेतल्याने नुकत्याचं होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमुळे या भेटीने महत्व प्राप्त झाले आहे .

महीन्यामध्ये लोकसभेचे बिगुल वाजणार असल्याने अनेक राजकिय पक्षामध्ये इनकमिंग , ऑटगोईग होवून छोट्या – छोट्या पक्षांना कॉग्रेस , भाजपा , शिवसेना , राष्ट्रवादी ( शरद पवार ) , राष्ट्रवादी ( अजित पवार ) , शिवसेना ( शिंदे गट ) आदी जवळ करत असून एकलव्य आदिवाशी बहुजन पक्षाच्या माध्यमातून रेवननाथ जाधव यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यामध्ये आदिवाशी समाज्याचे मोठ्या प्रमाणात संघटन केले असून गावो गावी एकलव्य आदिवाशा बहुजन पक्षाच्या शाखा उभ्या केला असल्याने आदिवाशी समाज्याचे मोठे संघटन झाल्याने कॉग्रेस पक्षासह भाजपा ने ही मैत्रीचा हात पुढे केला आहे . मात्र अचानक लोणी मध्ये जावून माजी मंत्री आ बाळासाहेब थोरात यांनी जाधव यांची भेट घेत विविध विषयावर चर्चा केल्याने या भेटीने अनेकांचे भूवया उंचावल्या आहे . 
यावेळी रेवणनाथ जाधव यांनी त्यांचे शाल,श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला त्यावेळी पदाधिकारी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते. 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed