आश्वी | झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील सामाजिक दृष्ट्या महत्वाच समजले जाणारे कोकणगांव शिवापुर येथील युवकांनी माता रमाई जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली . .
 या कार्यक्रमासाठी भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणूकीत युवा वर्ग तसेच महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता या कार्यक्रमापसंगी युवा सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र पवार यांनी सांगितले की माता रमाई यांच्या त्यागामुळेच डॉ बाबासाहेब आंबेडकर याचे परदेशात शिक्षण झाले स्वताचे चार मुले मरण पावली तरी बाबासाहेब आंबेडकर पाठीमागे खंबीर उभी राहीली ती रमाई होती आजच्या सर्व महिलांनी रमाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी असे सांगितले 
तर पत्रकार भाऊसाहेब पवार यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले या कार्यक्रमांसाठी युवा कार्यकर्ते तेजस गायकवाड संकेत पवार सोमनाथ पवार राहुल पवार रामनाथ गायकवाड कैलास पवार योगेश पवार तेजस पवार अशोक पवार अविनाश गवळी सोमनाथ गवळी विवेक सोनवणे चेतन पवार नाना पवार दत्तु पवार आदींनी सहकार्य करुन कार्यक्रम यशस्वी केला
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed