आश्वी | झुंजार न्यूज
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये 5 मार्च 2024 रोजी अकोले व संगमनेर शहरात होणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजना करिता ‘ नियोजनाची बैठक ‘ रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता आश्वी बुद्रुक येथील राम मंदिरामध्ये होणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष अशिष शेळके यांनी दिली आहे .

या होणार्या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव , महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , ज्येष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात, युवक जिल्हाध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे राज्य सचिव दीपक गायकवाड , राजाभाऊ कापसे , भीमा बागुल आदी मार्गदर्शन करणार आहे.

या बैठकीमध्ये प्रामुख्याने कार्यक्रमासंदर्भात नियोजन कशाप्रकारे करावयाचे तसेच आगामी लोकसभा विधानसभा तसेच पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुकी संदर्भात चर्चा विनिमय करण्यात येणार आहे.

तरी या बैठकीसाठी सर्व पदाधिकारी युवक कार्यकर्ते महिला पदाधिकारी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष आशिष शेळके, कार्याध्यक्ष विजयराव खरात, अमोल रागपसरे ,शहराध्यक्ष कैलास कासार, युवकाध्यक्ष योगेश मंन्तोडे , महिला तालुकाध्यक्ष रुपालीताई सोनवणे , मीना बिडगर ,मधुकर सोनवणे, विकास गायकवाड, पप्पू रोकडे, शरद तपासे, शरद जमदाडे, आत्माराम आडंगळे, प्रकाश वाघमारे, जनार्दन साळवे, बाळासाहेब कदम, नाना कदम, संपत भोसले, गौतम वर्पे, सागर शिंदे, भरत भोसले, स्वप्निल कदम, रमेश भोसले, नवनाथ भोसले, नंदू शिंदे, विजय अडांगळे, प्रकाश टपाल, रवी रोकडे, युवराज भालेराव, शाहनवाज बेगमपुरे, रुपेश राऊत, सिद्धार्थ खरात, योहान मिसाळ, राजू वाघमारे, रमेश तपासे, गणेश गायकवाड, लक्ष्मण मेढे, मच्छिंद्र पवार, नाना जगताप, सागर गायकवाड, कल्याण कदम, अमित रोकडे, सनी लोंढे, सौरभ शेळके, प्रतिक शेळके, अभिषेक शेळके, सुनील कदम, विजय खेमनर, सुभाष शेळके, सतीश जगताप आदींनी केले आहे .
Post Views: 649
