उद्योगपती स्व. माधवलालजी मालपाणी यांच्या स्मृतींना उजाळा

संगमनेर । झुंजार न्यूज

 

मालपाणी उद्योग समूहाचे प्रेरणास्थान स्व. माधवलालजी मालपाणी यांच्या स्मरणार्थ ११ फेब्रुवारी २०२४ रोजी संगमनेरमधील युवक-युवती, विद्यार्थी, प्रौढ तसेच ज्येष्ठ नागरिक हजारोंच्या संख्येने सफायर मॅरेथाॅनमध्ये धावले. सकाळी ७ वाजता थंडीतही हजारोंच्या संख्येने नागरिक या सफायर मॅरेथाॅनमध्ये सहभागी झाले हे लायन्स संगमनेर सफायरचे मोठे यश असल्याचे माजी अध्यक्ष व एमजेएफ गिरीश मालपाणी यांनी सांगितले.

 

सलग ११ व्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन लायन्स सफायरने केले. व्यायामाबाबत जागरूकता, निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी धावणे हा उत्तम पर्याय आहे. हा उद्देश सफल झाल्याचे प्रकल्प संयोजक श्रीनिवास भंडारी यांनी सांगितले. प्रकल्प प्रमुख म्हणून सुनिता मालपाणी, सुमित मणियार, चैतन्य काळे, कल्याण कासट,  कृष्णा आसावा यांनी काम बघितले तर राजेश मालपाणी, महेश डंग, अध्यक्ष अतुल अभंग, सचिव जितेश लोढा, खजिनदार कल्पेश मर्दा यांनी मॅरेथाॅनचे यशस्वी संयोजन केले.  

 

यावर्षीच्या मॅरेथॉनमध्ये ७ किलोमीटर आणि १० किलोमीटर अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ७ किमीमध्ये मालपाणी लॉन्स ते राजहंस दुध संघ आणि शेवट पुन्हा मालपाणी लाॅन्स असा मार्ग होता. १० किमीमध्ये मालपाणी लाॅन्स, बस स्थानक ते अमृतवाहिनी इंजि. काॅलेज आणि शेवट मालपाणी लाॅन्स असा मार्ग होता. मोफत प्रवेश असलेल्या या स्पर्धेमध्ये प्रत्येक स्पर्धकाला मेडल आणि सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले.

 

या मॅरेथाॅनसाठी मालपाणी ग्रुप यांनी प्रायोजकत्व घेतले तर स्वदेश उद्योग समूहाने मॅरेथाॅन कॅपचे प्रायोजकत्व घेतले.

 

यावेळी मॅरेथाॅन पूर्ण करणारा प्रत्येक स्पर्धक हा विजेताच आहे या अनुशंगाने कोणताही गुणानुक्रम काढण्यात आला नाही. स्पर्धेची थीम रन फॉर फन अशी असल्यामुळे प्रत्येक स्पर्धकाने अगदी आनंदाने मॅरेथाॅन पूर्ण केली. मॅरेथाॅन पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून पुढील वर्षी अधिक जोशाने आणि उत्साहाने ही मॅरेथाॅन भरविणार असल्याचे अध्यक्ष अतुल अभंग यांनी सांगितले

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *