खिचडी वाटप कार्यक्रम संपन्न

संगमनेर । झुंजार न्यूज 

 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यारली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

 

शहरातील ऑरेंज कॉर्नर या ठिकाणावरून संगमनेर गावाचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री सोमनाथ जी वाकचौरे साहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय छावा संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष प्रवीण कानवडे जात असताना कानवडे तसेच विलास नवले, संभाजी हासे, राहुल राऊत, प्रशांत लोहोटे, ऋषिकेश हासे आदी मान्यवर उपस्थित होते

 

संगमनेर शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली जात असताना विविध ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात आले नवीन नगर रोड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष कपिल पवार व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच संगमनेर बस स्थानक परिसरातील दत्त मंदिर येथे संघटनेच्या वतीने खिचडी वाटप करण्यात आली

 

यावेळी संगमनेर शहराचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे उपस्थित होते यावेळी त्यात आस्वाद घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय छावा संघटनेचे विलास रसाळ,मारुती सोनवणे, सुशांत भोंडे, जालिंदर राऊत,पोपट भारसखाळ,सौरभ दिघे, अर्जुन सोनवणे, एकनाथ शेळके, सतीश गिते, अक्षय पन्हाळकर, विकास पानसरे, जगन गवांदे आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले !..

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *