संगमनेर । झुंजार न्यूज
राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकार नामदार डॉ रामदासजी आठवले यांच्या सूचनेवरून रिपाई ( आठवले ) पुरुस्कृत मांग – गारुडी समाज आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल राखपसरे यांची निवड करण्यात आली .

अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात आणि युवा जिल्हाध्यक्ष पप्पूभाऊ बनसोडे व संगमनेर तालुकाध्यक्ष आशिषभाऊ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मांग गारुडी समाजाच्या जिल्हाध्यक्ष तथा संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गट प्रमुख म्हणून अमोल राखपसरे यांची निवड करण्यात आली यावेळी राज्याचे जेष्ठ नेते उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, बाळासाहेब गायकवाड जिल्हा सपंर्क प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांतजी भालेराव जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात युवा जिल्हाध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे आशिषभाऊ शेळके यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानपूर्वक सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

या निवडीने आश्वी बु परिसराला आणि मांग गारुडी समाजाला चांगले नेतृत्व मिळाले म्हणून समाजातून आणि आश्वी बु पंचक्रोशीतून अमोल राखपसरे यांचे अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.
