पाथर्डी । झुजार न्यूज
श्री दादा पाटील राजळे शिक्षण संस्थेचे लोकनेते आप्पासाहेब राजे कॉलेज ऑफ फार्मसी अदिनाथनगर येथे शिक्षक पालक मेळाव्याचे नियोजन केले होते.
पालक हे शिक्षक आणि विद्यार्थी यामधील दुवा असतो विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षका एवढाच पालकांचा सहभाग असतो या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अपेक्षा फुंदे यांनी केले.
पालकांना विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अहवाल प्रा. कळमकर राजेंद्र यांनी सादर केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. संतोष पायघन होते प्रमुख पाहुणे म्हणून श्री.बी.एम. गोरेसाहेब, डॉ.राजधर टेमकर , डॉ.तांबोळी मेहबूब ,डॉ. बबनराव टिळेकर उपस्थित होते
पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष भाषणात डॉ. पायघन सर यांनी पालकांचा विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये किती मोलाचा वाटा असतो हे सांगितले पालक मेळावा आयोजित करण्याचे सांगितले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
कॉलेजच्या प्राचार्य श्री प्रदीप देशमुख सर यांनी महाविद्यालयात असलेल्या सुविधा विद्यार्थ्यांची प्रगती याबाबत आढावा सादर करून पालकांशी संवाद साधला सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुरज गिऱ्हे यांनी केली व आभार प्रा.हांडाळ सर यांनी केले सर्व. कार्यक्रम यशस्वी कण्यासाठी प्रा.विशाल फलके,विनोद भोयटे, कोमल काटे श्री.विकास वाघ, डॉ. धर्मराज सुरोसे,महेश डांगे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले
