संगमनेर । झुंजार न्यूज

महाराष्ट्र राज्य, उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “करिअर कट्टा” हा अभिनव उपक्रम गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाला बळ देण्यासाठी आणि त्यातील आव्हाने सोडविण्यासाठी अभिनव उपक्रम म्हणून पुढे आला आहे. विद्यार्थ्यांना जगण्याची, उभे राहण्याची, कौशल्य पुरविणे, स्पर्धात्मक युगात आपले स्थान निर्माण करणे तसेच आर्थिक साक्षरतेमध्ये ग्रामीण व शहरी युवकांना साक्षर करून त्याचे लाभ मिळवण्यासाठी सक्षम करणे या कार्यपद्धतीद्वारे राज्यातील उच्च शिक्षणाला मोठी मदत करण्याचे कामकाज मा.यशवंत शितोळे सर “करिअर कट्टा”च्या माध्यमातून करत आहे.

 

या उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ यावर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाविद्यालयाला एकूण आठ पुरस्कार प्राप्त झाले. यामध्ये उत्कृष्ट राज्यस्तरीय महाविद्यालय – द्वितीय क्रमांक (सन्मानचिन्ह व रोख रक्कम ७५ हजार रुपये),महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील यांना उत्कृष्ट प्राचार्य प्रवर्तक व राज्यस्तरीय उत्कृष्ट विभागीय प्राचार्य प्रवर्तक म्हणून प्रथम क्रमांक, उत्कृष्ट विशेष जिल्हा समन्वयक आणि उत्कृष्ट राज्यस्तरीय जिल्हा समन्वयक म्हणून प्रा. नवनाथ नागरे यांना तृतीय क्रमांकाने मा.डॉ.शैलेंद्र देवळाणकर संचालक, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मा.यशवंतराव शितोळे, मा.प्रो.व्ही.एन.राज सेखरन पिल्लई कुलगुरू, मा.बिपीन जगताप, संचालक, खादी व ग्रामोद्योग, मा.डॉ.संजय जगताप, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, मा.डॉ.हरिभाऊ शिंदे, सहसंचालक उच्च शिक्षण विभाग,मा.डॉ.उदय निर्गुडकर, मा.प्रफुल्ल पाठक, मा.सुनील झोडे, मा.संजय इंगळेया मान्यवरांच्या हस्ते मुंबई येथे गौरविण्यात आले आहे.

 

त्यांच्या व महाविद्यालयाच्या या यशाबद्दल राज्याचे लोकनेते व मार्गदर्शक आदरणीय मा.ना.बाळासाहेब थोरात साहेब, संस्थेचे चेअरमन मा.डॉ.सुधीरजी तांबे साहेब, मा.आ.सत्यजित तांबे, नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ मा.डॉ.जयश्रीताई थोरात, संस्थेचे सचिव मा.लक्ष्मणराव कुटे, सहसचिव मा.दत्तात्रय चासकर, रजिस्टर मा.बी.आर.गवांदे, उपप्राचार्य डॉ.बाळासाहेब वाघ, उपप्राचार्य डॉ.विलास कोल्हे, कार्यालयीन अधीक्षक श्री. गोरक्षनाथ पानसरे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक वृंद, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed